Raj Thackeray आक्रमक; महिला अत्याचारांवरील गुन्ह्याचा पाढाच वाचून दाखवला

191
Raj Thackeray आक्रमक; महिला अत्याचारांवरील गुन्ह्याचा पाढाच वाचून दाखवला
Raj Thackeray आक्रमक; महिला अत्याचारांवरील गुन्ह्याचा पाढाच वाचून दाखवला

आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विविध नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या (MNS Maharashtra Doura) दौरे सुरु आहेत. या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका, कॉर्नर सभा घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) विदर्भ दौऱ्यावर (MNS Vidarbha Doura) आहे. महिलांवर होणाऱ्या आत्याचारासंदर्भात नागपूर येथे पत्रकार परिषद घेत २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर (Nirbhaya case in Delhi) संबंधित आरोपींना १२ वर्षांनी फाशीची शिक्षा झाली. बलात्काराच्या खटल्यांना एवढा विलंब लागत असेल तर या गुन्ह्यांचे करायचे काय? असं सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  (Raj Thackeray)

(हेही वाचा – Neeraj Chopra Brand Value : नीरज चोप्राचं ब्रँड मूल्य ३३५ कोटींच्या दरात, हार्दिक पांड्यालाही टाकलं मागे)

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी काय सांगते? 

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत (Raj Thackeray Nagpur press conference) म्हणाले की, बदलापूरची घटना मनसेच्या महिला सेनेने त्याला वाचा फोडली. मात्र ती घटना झाल्यानंतर फटाक्यांची माळ लागल्यासारख्या इतर सर्व घटना पुढे आल्या. माझ्याकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी (Statistics from the National Crime Records Bureau) आहे. महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होतेय. देशातील आर्थिक राजधानी मुंबईतही महिलांना सुरक्षित वाटत नाही. २०२३-२४ आकडेवारीनुसार महिला विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले. त्यानंतर पुणे मग नागपूरचा नंबर आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा वाढता आलेख, बलात्कार, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचार, अपहरण आणि इतर…यात २०१७ साली महाराष्ट्रात ४३२० बलात्काराचे गुन्हे, २०१८ – ४९७४ बलात्कार, २०१९ – ५४१२ बलात्कार, २०२०- ४८४६ बलात्कार, २०२१-५९५४  बलात्कार, २०२२ – ७०८४ बलात्कार आणि २०२३- ७५२१ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.  (Raj Thackeray)

(हेही वाचा – Badlapur Case : बदलापूरच्या घटनेतून काय धडा घ्याल?)

२०१९ ते २०२१ या काळात किती मुली बेपत्ता झाल्या? 

तसेच महाराष्ट्रात दर तासाला १ गंभीर गुन्हा नोंदवला जातो. नोंद न झालेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. २०२२ च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत. २०१९ ते २०२१ या काळात बेपत्ता झालेल्या मुली १ लाख ८४२ प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या सुनावणीवेळी ही आकडेवारी समोर आली. बीड, सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची. कामावर सुट्टी होऊ नये म्हणून महिलांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे. बदलापूरचं प्रकरण (Badlapur School Case) अत्यंत दुर्दैवी, अशा लोकांना ठेचलेच पाहिजे. आपल्याकडे कठोर शासन आणि कठोर कायदा होत नाही हे यामागचं कारण आहे असं राज ठाकरेंनी संतापून म्हटलं. (Raj Thackeray)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.