अमरावतीत गर्दी पाहून संतापले Raj Thackeray, 20 मिनिटात आटोपली बैठक

281
अमरावतीत गर्दी पाहून संतापले Raj Thackeray, 20 मिनिटात आटोपली बैठक
अमरावतीत गर्दी पाहून संतापले Raj Thackeray, 20 मिनिटात आटोपली बैठक

निवडणुकविषयक आढावा घेण्याच्या उद्देशाने आज, शनिवारी सायंकाळी अमरावतीत (Amravati) पोहोचलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संतापाला स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागले. मी बैठक बोलावली आहे आणि तुम्ही मेळाव्यासारखी गर्दी केली, हे त्यांचे वाक्य होते. पुढे त्यांच्याच सूचनेनुसार प्रमुख पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्वांना बैठकीचे सभागृह सोडावे लागले.

(हेही वाचा – Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)
अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघांचा घेतला आढावा

आगामी निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने आढावा घेण्यासाठी राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुर येथून सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांचे येथील हॉटेल ग्रॅण्ड महफील येथे आगमन झाले. त्यांनी मोजून २० मिनिटांची बैठक घेतली. त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी ते वाशिमकडे रवाना झाले. या बैठकीदरम्यान त्यांनी अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची स्थिती कशी आहे, हे प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. मनसेचे जिल्हाप्रमुख पप्पू पाटील, शहरप्रमुख प्रवीण डांगे, धीरज तायडे, बबलू आठवले आदींनी त्यांना याबाबतची माहिती पुरवली. प्रारंभी आढावा बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आल्याचे दिसताच राज ठाकरे संतापले. केवळ पदाधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे सांगितल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. दरम्यान आगामी ३६ दिवसानंतर मी पुन्हा येणार आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान सभाही घेणार, हे त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या संभाषणानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलण्यासाठी माईक हातात घेतला. यावेळी त्यांनी ही बैठक आहे, मेळावा नाही. मेळाव्यात नेमका कोण पदाधिकारी व कार्यकर्ता कळायला मार्ग नाही,असे सांगून मला पदाधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, आपले बोलणे हे पक्षातील अंतर्गत बाबींचे आहे,असे स्पष्ट केले. यावेळी एकाने हात उंचावून आपणास बाेलायचे असल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी पुन्हा नाराजी दर्शविली. एका कार्यकर्त्यांने मनसेने शेतकरी प्रश्नावर निवडणूक लढवावी असे सूचविले. यावरदेखील ठाकरे यांनी नाराजी प्रकट केली. आपला विषय काय आणि आपण बाेलताे काय हे आपण ठरविले पाहिजे, असे सांगितले. या वेळी त्यांच्यासाेबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील आले हाेते. दाेघेही दाेन वेगवेगळ्या वाहनात बसले हाेते.

उमेदवाराची घोषणा नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) बहुतांश जागावर लढण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन दिवसांआधी पप्पू पाटील यांनी घेतलेला स्नेहमिलन सोहळा आणि त्यापूर्वी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांची झालेली बैठक यावरुन आज एखाद-दुसऱ्या मतदारसंघाचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अखेर ती फोल ठरली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.