अवघ्या जगाला हेवा वाटेल असे भव्य दिव्य श्रीराम मंदिर अयोध्येत उभे राहत आहे. २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभर यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण असतांना भाजपविरोधी पक्षांनी मात्र यावर टीका टिपण्णी सुरु केली आहे. अशा वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले आहे.
(हेही वाचा LK Advani : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक)
काय म्हणाले राज ठाकरे?
२२ जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करा, दिवे लावा, रांगोळी काढा, सण साजरा करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. हिंदूंना आता २२ जानेवारीच्या उत्सुकता लागली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यानिमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमीवर राममंदिराचा शिलान्यास होणार आहे. बलिदान झालेल्या, लढलेल्या असंख्य कारसेवकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा, पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये, असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी शनिवारी, १३ जानेवारी रोजी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतील मंदिरे व महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या.
Join Our WhatsApp Community