Raj Thackeray Marathwada Visit : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; मनसेची उबाठाला चेतावणी

143
Raj Thackeray Marathwada Visit : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; मनसेची उबाठाला चेतावणी
Raj Thackeray Marathwada Visit : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; मनसेची उबाठाला चेतावणी

मराठवाड्यात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा सुरू आहे. बीडमध्ये त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उबाठा गटाच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांनी केला. ‘राज ठाकरे सुपारीबाज आहेत’, असे म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या. यानंतर मनसने उबाठा गटाला इशारा दिला आहे. (Raj Thackeray Marathwada Visit)

(हेही वाचा – बीडमध्ये Raj Thackeray यांचा ताफा उबाठा गटाने अडवला; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने)

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, उबाठा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार आहोत.

काय आहे प्रकरण ?

राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली, आरक्षणाविरोधात बोललेले आम्ही सहन करणार नाही, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. आतापर्यंत मराठवाड्यात मराठा आंदोलकांच्या रोषाला राज ठाकरेंना सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांचे बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. काही काळ मनसैनिक आणि उबाठा कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली.

राज ठाकरे यांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का, असे विचारले आहे. (Raj Thackeray Marathwada Visit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.