एसीबी चौकशीनंतर उबाठा गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. (Rajan Salvi ACB Enquiry)
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा)
कार्यकर्ते आक्रमक
१८ जानेवारी रोजी सकाळीच राजन साळवी यांच्या रत्नागिरी (Ratnagiri) येथील घरी एसीबीने धाड घातली. राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे राजन साळवी यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रडारवर आहेत.
राजन साळवी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी, ”अटकेला घाबरत नसून आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही”, असे साळवींनी ठामपणे सांगितले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल; दावोस येथील परिषदेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास)
कुटुंबियांचीही चौकशी
आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे 118 टक्के संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. रत्नागिरी, राजापूरसह (Rajapur) इतर ठिकाणी धाड टाकली. मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली आहे. एसीबीने गुन्हा दाखल केल्यामुळे साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली झाली आहे.
६ तास चौकशी
रत्नागिरी जिल्हा बँकेतील (Ratnagiri District Bank) लॉकर तपासण्यासाठी आमदार साळवी यांना बॅंकेत नेण्यात आले. राजन साळवींना (Rajan Salvi) एसीबी अधिका-यांनी त्यांच्या घरातून बँकेकडे नेतांना कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. साळवींना पोलिसांच्या वाहनातून नेण्यास शिवसैनिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे साळवींना चौकशीसाठी बँकेत नेतांना त्यांच्या स्वत:च्या वाहनातून जाण्याची मुभा दिली. आमदार राजन साळवी यांची वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. सकाळपासून त्यांची ६ तास चौकशी करण्यात आली. (Rajan Salvi ACB Enquiry)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community