Rajasthan : वर्षभरात रणथंबोरमधील 25 वाघ बेपत्ता

64
Rajasthan : वर्षभरात रणथंबोरमधील 25 वाघ बेपत्ता

राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून गेल्या वर्षभरात 25 वाघ बेपत्ता झालेत. या अभयारण्यात 75 वाघ होते त्यापैकी 25 वाघ बेपत्ता झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. एका वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ बेपत्ता झाल्याचा अधिकृत अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बेपत्ता वाघांना शोधण्यासाठी 3 सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक 2 महिन्यात मुख्य वन्यजीव कार्यालयाला सादर करणार आहे. रणथंबोरमधून वर्षभरात 25 वाघ बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. (Rajasthan)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : विश्व हिंदू परिषदेची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोहीम)

वाघ बेपत्ता झाल्याची बातमी विभागीय व्याघ्र निरीक्षण अहवालातूनन समोर आली आहे. याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. के. उपाध्याय यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून, ही चौकशी समिती रणथंबोरमधून बेपत्ता झालेल्या वाघांचा अहवाल दोन महिन्यांत सादर करणार आहे. पवनकुमार उपाध्याय यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. मोहनराज जयपूर आणि मानस सिंग यांची चौकशी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी समिती वाघ बेपत्ता झाल्यानंतर शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी करेल. (Rajasthan)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या हातातील लाल पुस्तकात फक्त कोरी पाने; भाजपा म्हणते, संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है!)

यासोबतच कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. रणथंबोरच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ही समिती आपल्या सूचनाही देईल. यापूर्वी रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 दरम्यान 13 वाघ बेपत्ता झाले होते. रणथंबोरमधून वाघ बेपत्ता होत असल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, वाघांची संख्या वाढत आहे, वाघांना प्रदेशासाठी पुरेशी जागा मिळत नाही, त्यामुळे वाघांमध्ये परस्पर संघर्ष वाढत असून, कमजोर वाघ रणथंबोरमधून बाहेर पडत आहेत.  तसेच, अनेक वेळा शक्तिशाली वाघाशी संघर्ष होऊन दुर्बल वाघाचा मृत्यूही होतो. विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा मृत वाघांचा शोध लागत नाही आणि विभाग वाघ बेपत्ता झाल्याचे मानतो. रणथंबोरमधील अधिकारी व्याघ्र संवर्धनापेक्षा पर्यटनावर भर देतात, असे वन्यजीव तज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमी सांगतात. (Rajasthan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.