राजस्थानच्या बिकानेरमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. हा भूकंप मध्यरात्री 2.16 वाजेच्या सुमारास झाला. भूकंपाची खोली 8 किलोमीटर होती. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 516 किमी पश्चिमेला होता.
( हेही वाचा : अधिवेशनात सर्वाधिक काम कोणी केले?; पहा महाविकास आघाडी आणि युती सरकारची मार्कशीट)
अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे भूकंपाचे धक्के
राजस्थानमधील बिकानेरशिवाय रविवार 26 मार्चला पहाटे अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची खोली 76 किमी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने यापूर्वी माहिती दिली होती की, 25 मार्च रोजी म्यानमारमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
उत्तर भारत हादरला
गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या आठवड्यात दिल्ली एनसीआर परिसर सुद्धा भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. सुमारे ३० ते ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे उत्तर भारतातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community