राजस्थान (Rajasthan) पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष पीडितेवर बलात्काराच्या केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद आरिफ अब्बासीला अटक केली आहे. पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. क्लॉक टॉवर पोलिस स्टेशनचे (Clock Tower Police Station) प्रभारी वीरेंद्र सिंह (Virender Singh) याप्रकरणी म्हणाले की, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर, एक पथक तयार करण्यात आले आणि आरोपींना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.
( हेही वाचा : Degree in Cricket : आता क्रिकेटमध्येही घेता येणार पदवी, मुंबई विद्यापीठात लवकरच अभ्यासक्रमाला सुरुवात)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या खबऱ्याला याप्रकरणी माहिती मिळाली की आरिफ नावाचा आरोपी अजमेरच्या शीशा खान (Shisha Khan) परिसरात लपून बसला आहे. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. आणि त्यांनी ३६ वर्षीय मोहम्मद आरिफ अब्बासीला (Arif Abbasi) अटक केली. त्यांच्या वडिलांचे नाव फजलुद्दीन अब्बासी (Fazluddin Abbasi) असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community