500 रुपयांत मिळणार LPG सिलिंडर! ‘या’ योजनेत नावाची नोंद असेल तर होणार मोठा फायदा

145

दारिद्र्य रेषेखालील आणि उज्ज्वला योजनेत नावाची नोंदणी केलेल्या नागरिकांना ५०० रूपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोमवारी ही मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले आहे. यासह नागरिकांना रसोई किटमध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा गहलोत यांनी केली आहे.

(हेही वाचा – Online Fraud रोखण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल, मोबाईलमध्ये जपून ठेवा ‘हा’ 4 अंकी नंबर)

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांना गॅस घेता यावा, यासाठी उज्ज्वला योजना आणली होती. त्यामुळे घरोघरी गॅस सिलिंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उज्ज्वला आणि बीपीएल धारकांना सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. अशातच राजस्थान सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती निम्म्यावर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या राज्याने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

१ एप्रिल २०२३ पासून राज्यातील बीपीएल आणि उज्जला योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांना ५०० रूपयांत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. अलवरमधील मलाखेडा येथे जाहीर सभेत बोलतांना अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली आहे. गहलोत यांच्या सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी गोरगरिबांना मोठा दिलासा दिला आहे. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरू करणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे समावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हे सरकारचे लक्ष्य असल्याचे गहलोत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, सध्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू आहे. सध्या सिलिंडर १ हजार ४० रूपयांना मिळते ते गरिबांना वर्षभरात १२ सिलिंडर ५०० रूपयात मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.