Veer Savarkar : राजस्थान सरकारचा स्वागतार्ह निर्णय; पाठ्यक्रमात शिकवणार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा इतिहास

काही नेते वीर सावरकर देशकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतात, असे नेते केवळ वीर सावरकर यांचा अवमान करत नाही तर देशाचा अपमान करत आहेत, ते देशभक्त असूच शकत नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दिलावर म्हणाले.

1174
राजस्थान सरकारमधील शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी नव्या शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमातून महाराणा प्रताप, हिंदवी स्वराज्याचे संस्थापाक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान बनलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचा इतिहास शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय म्हणाले शिक्षणमंत्री दिलावर? 

गेल्या वर्षी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची नवीन इमारत देशाला समर्पित केली होती. त्यादिवशी वीर सावरकर (Veer Savarkar) यांची जयंती होती. त्यामुळे त्याला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. विशेष म्हणजे स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा देशाचे महान पुत्र असा उल्लेख लेखी पत्राद्वारे करून त्यांचा गौरव केला होता. हे पत्र आजही इतिहासाच्या पानात नोंदवले गेले आहे. असे असूनही काही नेते वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, त्यावेळी प्रचंड यातना सहन केल्या. असे असताना काही नेते वीर सावरकर  (Veer Savarkar) देशकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतात, असे नेते केवळ वीर सावरकर यांचा अवमान करत नाही तर देशाचा अपमान करत आहेत, ते देशभक्त असूच शकत नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दिलावर म्हणाले.

अभ्यासक्रमातील बदलासाठी समिती स्थापन 

आता आम्ही अभ्यासक्रमातील बदलासाठी समिती स्थापन करत आहोत, जी पाठ्यपुस्तकातील मजकुराचा अभ्यास करेल. अभ्यासाअंती ज्या काही योग्य सूचना दिल्या जातील, त्याचा शासकीय स्तरावर आढावा घेतला जाईल, जे अयोग्य असेल ते काढून टाकले जाईल आणि जे योग्य असेल त्याचा समावेश केला जाईल. सर्वच राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारकांचा इतिहास एकाच पुस्तकातून शिकवता येणे शक्य होणार नाही, म्हणून त्यातील महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा इतिहास तरी आम्ही पाठ्यपुस्तकातून शिकवणार आहोत, असेही शालेय शिक्षण मंत्री दिलावर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.