
राजस्थानातील (Rajasthan) ब्यावारमध्ये हिंदू (Hindu) मुलींना फसवणारी ‘लव्ह जिहादी’ पीडितांना मौलवींकडे घेऊन जात असे. हिंदू (Hindu) मुलींना सिगारेट ओढण्यास सांगितले जात असे. हिंदू (Hindu) मुलींना कट्टरपंथी तरुणांशी मैत्री करण्यास भाग पाडले असे आणि हे सर्व केले नाही तर संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याची धमकी पीडित हिंदू (Hindu) मुलींना दिली जात. हिंदू मुलींना जीन्स आणि टॉप घालण्यास मनाई करण्यात येत. या प्रकरणात सध्या ६ धर्मांध तरुणांना अटक करण्यात आली आहे. अजमेरच्या वकिलांनीही त्याचा खटला लढण्यास नकार दिला आहे. (Rajasthan)
( हेही वाचा : Gargai Water Project ला सरकारची २०१३ मध्येच मंजुरी; महापालिकेतील तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी घालवली ९ वर्षे वाया)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ब्यावारमध्ये हिंदू (Hindu) मुलींनी अडकवणारी टोळी त्यांना मशिदीत जाऊन मौलवींना भेटण्यास सांगायची. त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. यापूर्वी, पीडितांनी सांगितले होते की, मुस्लिम मुले पीडित हिंदू (Hindu) मुलींना ‘रोजा’ (मुस्लिम धर्मीयांचा एकप्रकारचा उपवास) ठेवण्यास आणि नमाज अदा करण्याचे प्रशिक्षण देत. तसेच ते तरुण आम्हाला कलमा म्हणायलाही सांगायचे. अशाप्रकारे हिंदू मुलींना चित्रफितीद्वारे कॅमेऱ्यासमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. (Rajasthan)
एका पीडितेने त्या धर्मांध तरुणाबद्दल सांगितले की, “त्याने माझ्या मित्राच्या माध्यमातून मला अडकवले. तो त्या मित्राला धमकावत असे. जेव्हा मी अडकले तेव्हा तो मला इतर मुलींसोबत ओळख करून देण्यास आणि त्याच्याशी बोलायला लावण्याची धमकी देऊ लागला. त्याने मला एक छोटा फोन दिला होता… तो मला भेटण्यासाठी वारंवार धमकी द्यायचा. त्याने मला ५ सेकंदांसाठी भेटायला बोलावले आणि नंतर एका कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथे त्या धर्मांध तरुणाने माझ्यासोबत अश्लील कृत्य केले. त्याने माझा फोटो काढला होता आणि याद्वारे तो पुढे मला धमकावत होता. तो कुटुंबातील सदस्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत असे. त्याने मला मारहाणही केली, असा अनुभव पीडितेने सांगितला. (Love jihad)
पीडितेने पुढे सांगितले की, “त्याने माझ्याकडून खूप पैसेही घेतले आहेत. मी त्याला जवळजवळ १० हजार रुपये आधीच दिले आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला फोनवर बोलताना पकडले. मी नकार दिल्यानंतरही तो अश्लील कृत्ये करत असे. तो माझ्या कुटुंबातील सदस्यांना मारण्याची धमकी देत असे, म्हणून मी घरी कोणालाही सांगितले नाही. तो मला सिगारेट वगैरे ओढायला सांगायचा. तो मला कलमा म्हणायला, रोजा धरायला आणि बुरखा घालायला सांगायचा. मी जीन्स आणि टॉप घातला तरी तो मला धमकावत असे. तो म्हणायचा की तुम्ही दगडाला देव मानता… आमच्या इस्लाममध्ये या. त्याने मला मारहाण केली आणि माझ्या अंगावर वारही केले, असा आरोपही पीडितेने केला. ” (Love jihad)
दुसरा पीडिता म्हणाली की, “त्या मुलाचे नाव करीम आहे, पूर्वी तो शाळेकडे यायचा. त्याचे मित्र सोहेल मन्सूरी, रेहान मन्सूरी आणि सोहेफ होते. त्याने मला त्याच मुलींद्वारे अडकवले ज्यांना त्याने आधीच अडकवले होते. त्याने मला नमाज अदा करण्यास आणि बुरखा घालण्यास सांगितले. पाच शुक्रवारच्या नमाजांचा उल्लेख होता. मला सांगण्यात आले होते की लहान कपडे घालू नको. तो मला अधूनमधून भेटायला आणि इतर मुलींशी संपर्क साधायला सांगायचा. तो माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी मला देत असे. (Love jihad)
पोलिसांनी पीडितांचे जबाबही नोंदवले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी रिहान मोहम्मद (Rihan Mohammed) (२० वर्षे), सोहेल अन्सारी (१९ वर्षे), लुकमान (२० वर्षे), अरमान पठाण (१९ वर्षे), साहिल कुरेशी (१९ वर्षे) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात पोलिस आता पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत. पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली आहेत आणि दुसरा आरोपी नदीम कुरेशी (Nadeem Qureshi) याचीही चौकशी करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले आहेत. त्याच वेळी, आरोपींचे कुटुंबीय हिंदू (Hindu) पीडितांना दोष देत आहेत. (Love jihad)
हे सर्व मुस्लिम मुले प्रथम अल्पवयीन हिंदू मुलींना फसवत असत आणि नंतर त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत असत, असे आढळून आले आहे. त्या मुलींना इतर मुलींशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. जर हे केले नाही तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनी पैसे उकळले आणि त्यांना धमकावले. धर्मांतरही उघड झाले आहे. आता पोलिस या प्रकरणात कारवाई करत आहेत. त्याच वेळी, पोलिसांनी म्हटले आहे की या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा कोणताही प्रकार नाही. (Rajasthan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community