Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार ‘हा’ अनोखा जागतिक विक्रम

Rajasthan Surya Namaskar : 15 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे आणि या दिवशी राजस्थानमधील भजनलाल सरकारला सूर्यनमस्कार घालण्यात जागतिक विक्रम घडवायचा आहे.

214
Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार 'हा' अनोखा जागतिक विक्रम
Rajasthan Surya Namaskar : रथसप्तमीला राजस्थान करणार 'हा' अनोखा जागतिक विक्रम

राजस्थानमध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Rajasthan Surya Namaskar) शाळेत सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजस्थानचे शालेय शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी हे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – Rohit Pawar यांची ईडीकडून तब्बल १२ चौकशी)

राजस्थानमध्ये 15 फेब्रुवारी रोजी सर्व शाळांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे आणि या दिवशी राजस्थानमधील भजनलाल सरकारला (Bhajan Lal Sharma) सूर्यनमस्कार घालण्यात जागतिक विक्रम घडवायचा आहे. या जागतिक विक्रमाची तयारी म्हणून या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

दररोज सूर्यनमस्कार 15

मदन दिलावर (Madan Dilawar) यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारांचे महत्त्व सांगून दररोज 15 सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन केले आहे. मदन दिलावर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी किमान 15 सूर्य नमस्कार करावेत. आपण 15 फेब्रुवारीपर्यंत दररोज 15 सूर्यनमस्कार घालणे अनिवार्य करणार आहोत. त्यानंतर व्यायामाची आवड निर्माण होऊन विद्यार्थी स्वतःहून दररोज व्यायाम करतील. (Rajasthan Surya Namaskar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.