कानपूरपाठोपाठ Rajasthan मध्येही रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वे रूळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा

91
कानपूरपाठोपाठ राजस्थानमध्येही रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वे रूळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा
कानपूरपाठोपाठ राजस्थानमध्येही रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वे रूळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा

उत्तर प्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही रुळांवर अवजड वस्तू ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे १०० किलो वजनाचे सिमेंटचे ठोकळे आढळून आले आहेत. या ठोकळ्यांच्या आडून एखा मालगाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Kolkata rape case : डॉक्टरांना सर्वोच्च न्यायालयाचा अल्टिमेटम; कामावर परतावे, अन्यथा…)

पोलिसांत तक्रार प्रविष्ट

केवळ एक ब्लॉकच नाही, तर त्याच्यापुढे साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत दुसरा ठोकळा ठेवण्यात आला आहे. अजमेरमधील सराधना आणि बांगड ग्राम रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा घातपाताचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी डीएफसीसी कर्मचारी रवी बुंदेला आणि विश्वजित दास यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री १०.३६ च्या सुमारास रेल्वे रुळांवर सिमेंटचा ठोकळा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर तो तुटलेल्या स्थितीत सापडला. आणखी एक किमी अंतरावर आणखी एक ब्लॉक तुटून बाजूला पडलेला आढळला. दोन्ही ब्लॉक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, असे प्रथमदर्शी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

घातपाताचा हा तिसरा प्रयत्न

ठोकळे सापडल्यानंतर डीएफसीसी आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी मिळून सराधना येथून बांगड ग्रामपर्यंत टेहाळणी केली. मात्र या मार्गात सारे काही सुरळीत असल्याचे दिसून आले. मागच्या एका महिन्यात राजस्थानमध्ये रेल्वेला अपघात घडवण्याच्या प्रयत्नाची ही तिसरी घटना आहे. याआधी २८ ऑगस्ट रोजी बारां येथील छबडा येथे मालगाडीच्या मार्गावर दुचाकीचे भंगार ठेवून रेल्वे रुळांवरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ९ सप्टेंबर या दिवशीच उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे रेल्वे रूळांवर सिलेंडर ठेवण्यात आला होता. त्याला कालिंदी एक्स्प्रेसची धडक बसली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.