घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील रक्तपेढीत तब्ब्ल 200 लीटर रक्त वाया गेल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. 2017 ते 2021 या पाच वर्षांच्या काळात 776 रक्ताच्या पिशव्या वाया गेल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहितीमधून समोर आले. लाल पेशीचा साठा असलेले रक्त वापरले न गेल्याने कालबाह्यतेमुळे रक्त वाया गेल्याचे उघडकीस आले.
2017 साली 26 रक्त संकलन केलेल्या पिशव्या वाया गेल्या. 2018 साली 74 रक्त संकलन केलेल्या पिशव्या वाया गेल्या. हीच संख्या 2019 साली तब्ब्ल 159 वर पोहोचली. 2020 साली तर ऐन कोरोनाकाळात 225 रक्त संकलित केलेल्या पिशव्या वापरल्या न गेल्याने फेकाव्या लागल्याची नामुष्की रक्तपेढयांवर ओढवली. सर्वाधिक रक्त 2021 साली वाया गेले. 2021 साली 292 रक्ताच्या पिशव्या फेकाव्या लागल्या.
( हेही वाचा: मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील या जिल्ह्यांना दिलेला अतिवृष्टीचा अंदाज ठरला फोल )
वर्षागणिक वाया गेलेले रक्त ( लीटरप्रमाणे )
- 2017 – 7.5 लिटर
- 2018 – 20 लिटर
- 2019 – 47 लिटर
- 2020 – 67 लिटर