राज्यात पथदिव्यांसाठी सौरऊर्जा वापरणारे ‘हे’ आहे पहिले गाव!

140

राज्य सरकारने ग्रामीण भागातील पथदिवे सोलर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. तसेच गावात सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आता अनेक गावे सौरऊर्जा वापरतील. यामध्ये पुरंदर तालुक्यातील राख गावाने आघाडी घेतली आहे. पथदिव्यांसाठी सौरऊर्जा वापरणारे पुरंदर तालुक्यातील राख हे गाव देशातील दुसरे आणि राज्यातील पहिले गाव असणार आहे.

ग्रामपंचायतीला शून्य देयक

याबाबतची माहिती राख येथील महेंद्र माने यांनी दिली. नेट मेटरींगच्या माध्यमातून दिवसभरात तयार झालेली वीज दिवसा महावितरणला दिली जाणार आहे, तर रात्री पथदिव्यांसाठी पुन्हा महावितरणाकडून वीज घेतली जाणार आहे. दररोज १,५०० युनिट वीज यातून निर्माण होणार असून, रोज तेवढीच वीज महावितरणकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला शून्य देयक येणार आहे.

( हेही वाचा : नमामि चंद्रभागा अंतर्गत ११८ गावांत सांडपाणी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन )

जानेवारीत उद्घाटन

१२० खांबांद्वारे गाव उजाळणार आहे. ५२ लाख ५० हजार रुपयांचे हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या फंडातून राज्यातील हा पहिला प्रकल्प असून, जानेवारी महिन्यात याचे उद्घाटन होणार आहे. सध्या राखमलस्वामी मंदिर, आरोग्य उपकेंद्र, महादेव मंदिर, स्मशानभूमी, माने वस्ती असे २.५ किलोमीटर रस्त्याच्या शेजारी खांब उभे करण्याचे काम सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.