Ram Durbar Coin: ब्रिटिशकालिन नाण्यांवर ‘रामदरबार’ मुद्रित; राम-लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिकृती चिन्हांकित

207
Ram Durbar Coin: ब्रिटिशकालिन नाण्यांवर 'रामदरबार' मुद्रित; राम-लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिकृती चिन्हांकित
Ram Durbar Coin: ब्रिटिशकालिन नाण्यांवर 'रामदरबार' मुद्रित; राम-लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिकृती चिन्हांकित

अयोध्येतील सोहळ्याचा देशभरात उत्साह साजरा होत आहे. २२ जानेवारीपासून एका नव्या पर्वाला सुरू होत आहे. आजपासून ४०० वर्षांपूर्वीही रामदरबार नाण्यांवर मुद्रित होता. राम-लक्ष्मण, हनुमान यांच्याही प्रतिकृती चिन्हांकित होत्या आणि ही चलने (Ram Durbar Coin) दैनंदिन व्यवहारात होती.

ब्रिटिशकालीन भारतातील दैनंदिन वापरातील चलनांवरचा हा रामदरबार मानसिंगराव पाटील यांनी दाखवला. त्यांच्या पणजोबांच्या काळातील नाण्यांचा परिचय करून दिला. सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. माढा) इथले मानसिंगराव पाटील १९७० पासून शहरात वास्तव्यास आहेत. ते शासकीय विद्यानिकेतनमध्ये कार्यरत होते. कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात फिरण्याची संधी त्यांना मिळाली.

(हेही वाचा – Ram Mandir Pranpratistha : राष्ट्रीय तीर्थक्षेत्र अंदमानात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा)

पाटील यांनी नाणीसंग्रह, स्टॅम्प यांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला. स्काऊट कमिशनर असताना त्यांनी परदेशी नाण्यांचा संग्रह जमवला. या नाण्यांमधून त्या काळातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अंदाज येतो. नव्या पिढीने याचा अभ्यास केला तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

इंग्रजांनाही पटले भारतीय संस्कृतीचे महत्त्व
पाटील यांच्याकडे त्यांच्या पणजोबांच्या काळातील नाणी आहेत. ही नाणी त्यांच्या देव्हाऱ्यात असायची. कारण यातील तांब्याच्या नाणीवर हनुमान असून पितळेच्या काही नाण्यांवर राम-लक्ष्मण व रामदरबार मुद्रित आहे. ही नाणी १६१६ सालची आहेत. नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव आहे. ही अर्धी नाणी आहेत. व्यापारानिमित्त आलेल्या इंग्रजांनीही इथल्या संस्कृतीचा विचार करून जाणीवपूर्वक ही चलन तयार केली, असे मानसिंगराव पाटील यांचे मत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.