Ram Lalla Idol First Photo : राम मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचा पहिला फोटो वायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर अनुष्ठान करत आहे. त्यांचा ११ दिवसांचा अनुष्ठान विधी सुरू आहे. या ११ दिवसांच्या विधीमध्ये पंतप्रधान मोदी हे जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. तर फक्त नारळ पाणी पित आहेत.

342
Ram Lalla Idol First Photo : राम मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचा पहिला फोटो वायरल

अयोध्येत सोमवार २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी (Ram Lalla Idol First Photo) शास्त्रानुसार एकामागून एक विधी केले जात आहे. याच अनुषंगाने गुरुवारी (१८ जानेवारी) मंदिराच्या गाभाऱ्यात श्री रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. रामलल्लाच्या मूर्तीची गुरुवारी संध्याकाळी मंदिराच्या गर्भगृहात स्थापना झाली. तब्बल एका शतकांनंतर, रामलल्ला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान केले गेले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामलल्लाच्या पवित्र मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र सध्या या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे.

(हेही वाचा – Tilak Park Girgaon : स्वराज्यभूमीवरील टिळक उद्यानात ‘लाईट एण्ड साऊंड शो’)

गर्भगृहात मूर्तीची प्रतिष्ठापना – 

मूर्तीची प्रतिष्ठापना (Ram Lalla Idol First Photo) करण्यासाठी एकूण ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. भगवान रामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधीसह पीठावर ठेवली होती. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते. तथापि, अंतिम अभिषेक २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात गुरुवारी स्थापन केलेली मूर्ती पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir ATS : प्रतिष्ठापने पूर्वी उत्तर प्रदेश ATS ने तीन संशयितांना पकडले; चौकशी सुरू)

रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो वायरल –

गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती (Ram Lalla Idol First Photo) स्थानापन्न झाल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं. (Ram Lalla Idol First Photo)

(हेही वाचा – Baroda Boat Capsized : बडोद्यामध्ये बोट उलटून १४ विद्यार्थ्यांसह १६ जणांचा मृत्यू)

पंतप्रधान मोदींचे अनुष्ठान –

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर अनुष्ठान करत आहे. त्यांचा ११ दिवसांचा अनुष्ठान विधी सुरू आहे. या ११ दिवसांच्या विधीमध्ये पंतप्रधान मोदी हे जमिनीवर चटई टाकून झोपत आहेत. तर फक्त नारळ पाणी पित आहेत. (Ram Lalla Idol First Photo)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.