अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या राष्ट्रीय कोअर कमिटीच्या बैठकीत अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभामुळे देशात ५० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजारात राम मंदिराशी संबंधीत विविध वस्तूंना मोठी मागणी आहे. मूर्ती आणि पूजा साहित्याची मागणी वाढत आहे. कॅटच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिराच्या उद्घाटनाने देशात पूजा पठणाशी संबंधित व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir)
राम मंदिर हे देशातील मोठे देवस्थान बनत असल्यामुळे येथे अनेक पर्यटक आणि भाविक या स्थळाला भेट देतील. त्यामुळे अनेक लोकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. विशेषतः लहान उत्पादक आणि लहान व्यवसाय मालकांसाठी व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. महिला बचत गटांसाठी व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मोठ्या संख्येने रोजगार मिळत आहे. राम मंदिरामुळे देशातील आर्थिक समृद्धीचा मोठा स्रोत उपलब्ध होईल. ( Ayodhya Ram Mandir)
पूजेच्या सामानाची मागणी वाढली
दिवसेंदिवस पूजेच्या सामानाची मागणी वाढली आहे. यामध्ये अगरबत्ती, शेण, सुगंधी कप, लोबान, कापूर, कुंकू, चंदन, रोली, अक्षता, कापसाचे दिवे, गंगेचे पाणी इत्यादी. मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. ताग, चटई, दरी आणि कापड इत्यादींपासून बनवलेल्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या आसनांना बाजारात मोठी मागणी आहे.तसेच “लहान ते मोठे राम झेंडे, फटाके,, श्रीराम बॅचेस याला लोकांची प्रचंड पसंती मिळत आहे.
श्रीरामाचे फोटो असलेले टी-शर्ट,कुर्ते ठरतायेत प्रमुख आकर्षण
मंदिराचे छापील कुर्ते किंवा हाताने भरतकाम केलेले कुर्ते, टी-शर्ट, शर्ट, टोप्या, श्रीराम दुपट्टे इत्यादींचीही विक्री केली जात आहे. त्यांच्या पूज्य देवाला अर्पण म्हणून फळे, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांनाही मोठी मागणी आहे. धार्मिक पुस्तके, श्री हनुमान चालीसा, आरती संग्रह इत्यादी. त्यांनाही मोठी मागणी आहे. माला, पेंडंट, लॉकेट, पेंडंट, ब्रेसलेट, बांगड्या, तुळशीची माळ,
हेही पहा –