Ayodhya Ram Mandir : मिळाल्या विक्रमी देणग्या; रामभक्तांच्या गर्दीत सातत्याने वाढ

एका दिवसात १५ ते २० लाख रुपयाची देणगी अर्पण केली जात आहे.

292
Ayodhya Ram Mandir : मिळाल्या विक्रमी देणग्या; रामभक्तांच्या गर्दीत सातत्याने वाढ

अयोध्येत काहीच दिवसांपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवसापासूनच लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. तर राम भक्तांकडून मोठ्या उत्साहाने देणगी दिली जात आहे. तर एका दिवसात १५ ते २० लाख रुपयाची देणगी अर्पण केली जात आहे.  Ayodhya Ram Mandir

राम मंदिराला विक्रमी देणग्या -अयोध्येतील राम मंदिराला २२ जानेवारीला आठ लाख रुपयांची देणगी मिळाली.२३ जानेवारीला राम भक्तांनी २ कोटी ८९ लाख रुपये अर्पण केले.२४ जानेवारीला राम मंदिरात भाविकांनी १४लाख रुपये अर्पण केले. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांकडून मंदिरामध्ये रोज १५ ते २० लाख रुपये अर्पण केले जात आहेत. आतापर्यंत भाविकांनी३. ५० कोटी रुपये अर्पण केले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे सढळहस्ते देणग्या देत आहेत.

(हेही वाचा :Maratha Reservation: मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अयोध्येत सातत्याने वाढतेय भक्तांची गर्दी -अयोध्येत ज्या पद्धतीने रामभक्तांची संख्या वाढत आहे. ते पाहता, रामललाच्या दर्शनासाठी रोज येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू ३लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही संख्या रामजन्मभूमीला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. शुक्रवारीही साडेतीन लाखांहून अधिक भाविक येथे पोहोचले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.