ठाणे शहरात रविवारी निघालेल्या श्रीराम मंदिर अक्षत कलश यात्रेनंतर आता श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे शहरातील ८ लाख घरांमध्ये संपर्क साधण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे.
श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा गृह संपर्क अभियान विभागाकडून येत्या काही दिवसांत ही मोहिम हातील घेतली जाणार आहे. या संपर्क अभियानात भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती पक्षाचे ठाणे शहर प्रमुख संजय वाघुले यांनी दिली.
(हेही वाचा – Goa Liberation Day : गोमंतक मुक्तीच्या वेळची राजकीय आणि सामाजिक स्थिती ! )
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा गृह संपर्क अभियानाचे प्रमुख विवेक कुलकर्णी आणि सहप्रमुख अविनाश मुंढे यांनी गृह संपर्क अभियानाची घोषणा केली.
महाआरतीत सहभागी होण्याचे आवाहन
या यात्रेच्या माध्यमातून ठाणे शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचून श्री रामाच्या चरित्राचे जागरण करण्याबरोबरच रामदूत होऊन घराघरांपर्यंत अक्षत दिले जाणार आहे. त्याचबरोबर जातीवाद, भाषावाद आणि प्रांतवादापासून सर्वांना मुक्त करून सनातन वैदिक धर्माची ओळख करून दिली जाणार आहे. त्यानुसार शहरातील आठ लाख घरांपर्यंत पोहोचून अक्षत, श्रीराममंदिराचे चित्र आणि पत्रक दिले जाईल. त्याचबरोबर अयोध्येतील श्री राम मंदिराच्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठाच्या वेळी आपल्या भागातील मंदिरात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत रामनाम जप, १०८ वेळा हनुमान चालिसा, सुंदरकांड आणि महाआरतीत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community