बालरुपातील रामलला (Ram Mandir) दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच आता भाविकांना रामलला दर्शन अधिक सुलभतेने घेता यावे, यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi government) पुढाकार घेतला आहे. अयोध्येत आता सुग्रीव पथ (Sugriva path) तयार केला जात आहे.
योगी सरकारने रामलला मंदिरापर्यंत नवीन रस्ता बांधून वाहतूक मार्ग सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवीन कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे.’सुग्रीव पथ’ नावाने बांधण्यात येणाऱ्या या कॉरिडॉरची लांबी २९० मीटर असेल. हनुमानगढी आणि राम मंदिर परिसरादरम्यान आयताकृती सर्किट म्हणून सुग्रीव पथ तयार केला जाणार आहे. राम मंदिरापर्यंत जाणे भाविकांना अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे आता रामलल्लाचे दर्शन घ्यायला दररोज येणाऱ्या लाखो भाविकांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणे आता सोपे होणार आहे.
‘सुग्रीव पथ’…
अयोध्येतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, कारण प्राणप्रतिष्ठेपासून दररोज दोन ते अडीच लाख भाविक राम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत, असा अंदाज श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. त्यामुळे राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना समस्या येत असल्यामुळे अयोध्येत सुग्रीव पथ नावाचा नवीन कॉरिडॉर उभारणीचे काम सुरू केले आहे. हा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अयोध्येतील प्रवास सुलभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाला सुरुवात
अयोध्येत हनुमान गढी ते राम मंदिरापर्यंत बांधण्यात येणाऱ्या सुग्रीव पथासाठी अंदाजे ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५.१ कोटी रुपये भूसंपादनासाठी वापरण्यात येणार आहेत. कॉरिडॉरची रुंदी अंदाजे १७ मीटर असेल. सुग्रीव पथाच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली आहे. सुग्रीव पथाच्या बांधकामासाठी आधी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community