Ram Navami 2025 : रामनवमीनिमित्त राज्यातील राममंदिरे भाविकांनी फुलली; नाशिक, शेगावसह सर्वत्र उत्साहाचे वातावरण

51

श्री रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये (kalaram temple nashik) मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे काकडा आरतीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमधून वर्षानुवर्षांची परंपरा जपत राम दिंड्या दाखल होत आहे. (Ram Navami 2025) प्रभु श्रीरामांच्या जन्म सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी श्री काळाराम मंदिरात राम भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

(हेही वाचा – Latur महापालिका आयुक्तांनी स्वत:वर झाडली गोळी; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू)

विदर्भ पंढरी संतनगरी शेगावमध्ये (Shegaon) श्रीराम जन्मोत्सव (shegaon ram mandir) श्री संस्थानकडून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. श्रीराम वमी उत्सवानिमित्त श्रींचे मंदिरामध्ये बुधवारपासून सुरू असलेल्या अध्यात्म रामायण स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान रविवारी सकाळी १० वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात विधीवत पूजन होईल. त्यानंतर कीर्तन, महाआरती व श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी मंदिरातून श्रींचा पालखी भव्य दिव्य नयनरम्य असा पालखी सोहळा निघेल. उत्सव निमित्ताने शहरात शनिवारपासून सर्वत्र भक्तिमय व राममय वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यभरातून टाळ मृदंगाच्या गजरात ६५० चे वर भजनी दिंड्या शेगावात दाखल झालेल्या आहेत. १ लाख पेक्षा अधिक भाविकांनी रात्रीच हजेरी लावली. भक्तांची गर्दी पाहता मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. भाविक श्रींचे समाधी दर्शन, तसेच गाभाऱ्यावर असणाऱ्या प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत असून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद व दर्शन झाल्याचे समाधान पहावयास मिळत आहे. (Ram Navami 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.