आज दि. ६ एप्रिलला देशभरात श्रीराम नवमी, म्हणजेच प्रभू रामाची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. खासकरुन श्रीराम जन्मभूमी (Ram Janmabhoomi) अयोध्येत (Ayodhya) तर दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. शरयूचा किनारा लाखो दिव्यांनी उजळून निघाला आहे. अयोध्येत आज सकाळपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे. सकाळी साडेनऊ वाजता प्रभू रामललाचा विशेष अभिषेक झाला, त्यानंतर दुपारी १२ वाजता भगवान रामाचा सूर्य टिळक झाला. (Rama Navami)
( हेही वाचा : Mumbai Airport वर २४ कॅरेट सोन्याच्या १६ सळ्या सीमाशुल्क विभागाकडून जप्त)
जगभरातील भाविकांनी रामललाच्या सूर्य टिळकाचे मनमोहक दृष्य पाहिले. त्यानंतर श्रीराम नवमीनिमित्त सरयू घाटावर (Saryu Ghat) संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामभक्तांनी मोठ्या संख्येने सरयू घाटावर आरतीसाठी गर्दी केली. यावेळी रामभक्तांनी लावलेल्या दिव्यांमुळे शरयूचा किनारा उजळून निघाला. रामोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाविकांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. यावेळी उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, रांगोळी आदींचे आयोजन केले. (Rama Navami)
या कार्यक्रमासाठी सायंकाळपासून शेकडो स्वयंसेवक सरयूच्या काठावरील चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) घाटावर पोहोचू लागले. संध्याकाळ जवळ येताच लोकांनी लखो अधिक दिवे लावून शरयूचा किनारा उजळवला. यामध्ये अनेक शाळांमधील मुलांचाही समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह वैदिक मंत्रांच्या पठणाने करण्यात आले. (Rama Navami)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community