Bakrid ला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर लिहिले ‘राम’; ३ धर्मांधांना अटक

काही महिन्यांपूर्वी याच दुकानदारावर गोमांस विक्री केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

10482
Bakrid ला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर लिहिले ‘राम’; ३ धर्मांधांना अटक
Bakrid ला कुर्बानीसाठी आणलेल्या बोकडावर लिहिले ‘राम’; ३ धर्मांधांना अटक

बकरी ईदच्या (Bakrid) निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या बोकडावर ‘राम’ लिहून त्याची विक्री करणार्‍या ३ धर्मांधांना सीबीडी बेलापूर (CBD Belapur) पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. विश्‍व हिंदु परिषदेचे (VHP) जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. महंमद शफी शेख, साजीद शेख, कय्युम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपा सज्ज, कार्यकर्त्यांना सल्ला देताना फडणवीस म्हणाले…)

विहिंपची पोलिसांत तक्रार

‘येथे एका दुकानात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या एका बोकडाच्या पोटावर ‘राम’ असे लिहिले असून त्याला क्रूरतेने वागणूक देण्यात येत आहे, तसेच त्याला हत्येच्या उद्देशाने बांधून ठेवले आहे’, अशी माहिती विहिंपचे स्वरूप पाटील यांना काही धर्माभिमान्यांनी दिली. त्यानुसार पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांसह संबंधित दुकानात जाऊन बोकड, रंगाचा डबा आणि ब्रश जप्त केला.

साहित्य आणि अन्य २२ बकऱ्या जप्त

यासोबतच दुकानातील अन्य २२ बकर्‍या कह्यात घेऊन त्यांना वाशीतील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी याच दुकानदारावर गोमांस विक्री केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित कारवाईच्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे (VHP) नवी मुंबई जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील, अमरजीत सुर्वे, नगर कार्यवाह निशांत नाईक, समाजसेवक नीलेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, बजरंग दल सहसंयोजक शंकर संगपाळ, तेजस पाटील, बेलापूर प्रखंड अध्यक्ष मुकेश गांधी, बेलापुर प्रखंड सहमंत्री सत्यप्रकाश सिंह, बेलापूर प्रखंड संयोजक जीवन देशमुख, बेलापूर प्रखंड सह संयोजक हर्षल सोनगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.