Viral Video: पाकिस्तानात हिंदू मंदिराला बनवले चिकन शॉप, सोशल मिडियावरून निषेध व्यक्त

अतिशय सुंदर दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर हिंदूंसाठी पूजनीय आहे.

313
Viral Video: पाकिस्तानात हिंदू मंदिराला बनवले चिकन शॉप, सोशल मिडियावरून निषेध
Viral Video: पाकिस्तानात हिंदू मंदिराला बनवले चिकन शॉप, सोशल मिडियावरून निषेध

पाकिस्तानच्या अहमदपूर सियाल इथला एक व्हिडियो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडियोमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानात यापूर्वीही मंदिरांचा विध्वंस आणि विटंबना झाल्याचे व्हिडियो व्हायरल झाले होते. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये एका मंदिरालाच चिकन शॉप बनवल्याचं या व्हिडियोमध्ये दिसत आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी मशिदीचं मंदिरात रुपांतर, तर कुठे मंदिरांना गोठे बनवल्याचेही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

(हेही वाचा – Bribery : लाचखोरीत नाशिककर अव्वल तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत मात्र सर्वात कमी सापळे ) 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडियो हा पाकिस्तानातील अहमदपूर सियाल येथील एका ऐतिहासिक सीता-राम मंदिराचा आहे. अतिशय सुंदर दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर हिंदूंसाठी पूजनीय आहे, पण आता या मंदिरात चिकन शॉप सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली असून निषेध व्यक्त केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.