‘पब’मध्ये रामायणातील गाण्यावर तरुणांचा नाच; नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

100

लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिकांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच तरुण वर्गामध्ये रामायण आणि महाभारत याविषयी आवड निर्माण होताना पाहायला मिळाली. एकीकडे ही आवड निर्माण होत असतांना दुसरीकडे मात्र काही तरुण मंडळी बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत रामायणातील गाण्यावर थिरकतांना दिसत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार नोएडामधील गार्डन गैलेरीया मॉलमधील एका बारमध्ये एका पार्टी दरम्यान रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील काही प्रसंग रिमिक्स करून लावण्यात आले. त्यावर तेथील तरुण मंडळी थिरकतांनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर बऱ्याच नेटकऱ्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणी नोएडा येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉर्ड ऑफ ड्रिंक्स असे या पबचे नाव असून त्या पेबच्या मालकावर आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.