Ramdas Athawale : गोरेगाव दुर्घटनेप्रकरणी रामदास आठवले यांनी केली ‘ही’ मागणी

125
Ramdas Athawale : गोरेगाव दुर्घटनेप्रकरणी रामदास आठवले यांनी केली 'ही' मागणी

शुक्रावर ६ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पश्चिमेच्या जय भवानी एसआरए इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू आणि ७० जण जखमी झाले. ही अत्यंत भीषण दुर्घटना आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच सर्व एसआरए इमारतीचे स्ट्रक्चरल फायर ऑडिट करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

गोरेगावच्या एसआरए इमारतीत सध्या लिफ्ट बंद पडलेली आहे. तसेच या इमारतीला पाणी पुरवठा होत नाही.आगीच्या दुर्घटनेनंतर या एसआरए इमारती मधील विविध समस्या उघडकिस आल्या आहेत. अनेक एसआरए इमारतीला ओसी देण्यात आलेली आहे त्या सर्व इमारतीचे फायर ऑडिट केले गेले नाही. गोरेगावच्या एसआरए इमारतीत झालेल्या अग्नी तांडवातून शासनाने धडा घ्यावा आणि पुन्हा अशी आग लागण्याची दुर्घटना होऊन जीवीत हानी होवू नये. म्हणून सर्व इमारतीचे फायर ऑडिट करावे अशी मागणी आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

(हेही वाचा – Marathi Gujarati Dispute : एका बोर्डवरून घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी?)

गोरेगाव इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने सांत्वनपर १० लाख रुपयांची मदत केली पाहिजे तसेच जखमींना देखील आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.