महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर शुक्रवारी (२२ डिसेंबर) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व ४० वर्षा हुन अधिक काळापासून वसलेल्या आहेत अशा झोपडपट्ट्यांचे निष्कासन तातडीने थांबवले पाहिजे. अधिकृत झोपडपट्टीवासीयांचे रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने अधिकृत पुर्नवसन केले पाहिजे. (Ramdas Athawale met Ashwini Vaishnaw)
पर्यायी घर देऊन रेल्वेरुळांलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुर्नवसन केल्यानंतरच रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या निष्कासनचा विचार करावा अशी आग्रही मागणी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चत रेल्वे मंत्री यांनी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांबाबत आम्हाला सहानुभुती आहे. अनेक वर्षांपासून हे रेल्वे रुळालगत राहणारे जे झोपडीवासी आहेत ज्या झोपडपट्ट्या आहेत निवासस्थाने आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर निष्कासन कार्यवाही होत आहे. ती कार्यवाही थांबवण्याबाबत आपण विचार करित आहोत, या झोपडपट्टीवासियांबद्दल सहानुभुती आहे. त्यामुळे त्याच्यावर या झोपडपट्ट्या निष्कासनाची कार्यवाही थांबवण्याचा आम्ही विचार करित असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना दिला. (Ramdas Athawale met Ashwini Vaishnaw)
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काय म्हणाले? वाचा सविस्तर…)
झोपडपट्ट्यांचे पूर्नवसन करण्याबाबत विचार विनिमय होणार
रेल्वेरुळालगत असणाऱ्या निवासस्थाने, झोपडपट्ट्यांना पर्यायी घर देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याबाबत आणि रेल्वेरुळाजवळ असणाऱ्या झोपडपट्ट्यांबाबत निष्कासन थांबवण्याची बैठक मुंबई मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृह येथे येत्या शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक; म्हाडाचे अधिकारी, एम. एम. आर. डी. ऐ. चे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि सर्व संबंधीतांना या बैठकीत निमंत्रित करण्यात आले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांना अभय दिले जाणार आहे त्यांचे पूर्नवसन करण्याबाबत विचार विनिमय होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सुध्दा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली आहे. (Ramdas Athawale met Ashwini Vaishnaw)
केद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या झोपडी महासंघाने नुकतीच भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी आघाडी परिषदेचे अध्यक्ष सुमित वजाळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सुमित वजाळे यांनी सुध्दा रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या बाबत अनेक प्रश्न मांडले. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या झेपडपट्टी परिषदेच्या शिष्टमंडळाने केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेतली. (Ramdas Athawale met Ashwini Vaishnaw)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community