सावरकरप्रेमी रमेश विष्णुपंत डांगे (Ramesh Dange) यांचे वयाच्या ८३व्या वर्षी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने बडोदा येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. नवतरुण वयात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swatantryaveer Savarkar ) आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’ वाचून डांगे यांनी सावरकर विचार प्रचाराला सुरुवात केली होती. ३८ वर्ष सरकारी नोकरीत असूनही त्यांनी सावरकर विचार प्रचाराचे कार्य अविरत चालू ठेवले. २०१३ साली रमेश डांगे (Ramesh Dange) यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. आता त्यांच्या जाण्याने सावरकरप्रेमींमध्ये शोकाचे वातावरण पसरले आहे.
( हेही वाचा : मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया)
३८ वर्ष शासकीय सेवेसह केले होते सावरकर विचार प्रसाराचे कार्य
रमेश डांगे यांचा पुणे विद्यापीठात ‘वीर सावरकर अध्यासन’ निर्मितीसाठी निधी उभारण्याच्या अभियानात मोलाचा सहभाग होता. चिनी आक्रमणानंतर तेजस्वी प्रखर विचारसरणीच्या शोधात असताना विक्रम सावरकरांच्या (Vikram Savarkar)
‘सावरकर तत्वज्ञान प्रसार केंद्रा’पासून प्रेरणा घेऊन १९६४ यावर्षी तसेच केंद्र बडोद्यात (Baroda) सुरु केले. या केंद्राचे संस्थापक सदस्य आणि कार्यवाह म्हणून वर्षानुवर्षे काम त्यांनी पाहिले. जवळजवळ ३८ वर्ष शासकीय सेवेत असूनही त्यांनी सावरकरांचे विचार सर्वदूर पोहचवण्याचे आणि सावरकर विचार प्रसाराचे काम केले.
गुजराती भाषेत ‘दावानल’ हे सावरकरांचे चरित्र लेखन
महाविद्यालयीन शिक्षणार्थ राजकोटमध्ये (Rajkot) असताना तेथेही केंद्र त्यांनी सुरु केले. १९६६ साली सावरकर आत्मार्पणानंतर श्रद्धांजली सभेवरची शासकीय बंदी मोडून सभेत ते सहभागी झाले होते. सावरकर विचार प्रसाराचे अविरत काम त्यांच्या हातून घडले. त्यांनी सावरकरप्रेमामुळे समग्र सावरकर साहित्याच्या वाचनाचा उपक्रम चालू केला. सावरकर जन्मशताब्दी पूर्ण वर्ष साजरी केली. व्याख्याने, निबंध-स्पर्धा, चित्रप्रदर्शन, परिसंवादाचे त्यांनी आयोजन केले. तसेच बडोद्यातील अखिल भारतीय हिंदूमहासभा अधिवेशनात रमेश डांगे सहभागी झाले होते. १९९८ मध्ये बडोद्यात ‘संरक्षण सेमिनार’ घेऊन त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. २००८ ला बडोद्यात वीर सावरकर स्मारक- क्रांतितीर्थाची निर्मितीत ही त्यांचा सहभाग होता. रमेश डांगे (Ramesh Dange) यांनी गुजराती भाषेत ‘दावानल’ हे सावरकरांचे चरित्रही लिहिले. तसेच सावरकर चरित्रावर व्याख्यानेही त्यांनी दिली. (Swatantryaveer Savarkar )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community