Ram Mandir In Ayodhya : प्रतिष्ठापनेपूर्वी रामलल्लांचे अयोध्या भ्रमण; 4 लाख गावांमध्ये साजरा होणार आनंदसोहळा

157
Ram Mandir In Ayodhya : रामलला 22 जानेवारीला होणार प्रतिष्ठापित; तयारीला वेग
Ram Mandir In Ayodhya : रामलला 22 जानेवारीला होणार प्रतिष्ठापित; तयारीला वेग

अयोध्येत उभ्या रहाणाऱ्या भव्य राममंदिरात रामलल्ला 22 जानेवारीला विराजमान होणार आहेत. (Ram Mandir In Ayodhya) 16 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत हा प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. अभिषेक करण्यापूर्वी शरयूची पूजा केली जाईल आणि रामलल्लाला अभिषेक केला जाईल. त्यानंतर त्यांना रथातून शहराच्या भ्रमंतीवर नेण्यात येईल. यानंतर रामलल्लाची मूर्ती प्रत्येकी एक दिवस जल, फल आणि अन्नात ठेवली जाईल. जगातील अनेक देशांतील 50 विशेष रामभक्तांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील संत आणि रामभक्तांसह 7 हजार लोकांनाही आमंत्रित केले जाणार आहे, असे ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले. (Ram Mandir In Ayodhya)

(हेही वाचा – Anti India Slogans In JNU :जेएनयूमध्ये पुन्हा देशविरोध उफाळला; पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा)

22 जानेवारीला अयोध्येतील मुख्य उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. (Ram Mandir In Ayodhya) या दिवशी ते अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजते. 9 दिवसांच्या उत्सवासाठी श्री रामयंत्राची प्रतिष्ठापना केली जाईल. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर ते शरयू नदीत विसर्जित करण्यात येणार आहे. सोहळ्यात हवनासाठी नऊ यज्ञकुंड उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण सोहळा काशीतील विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.  या संपूर्ण सोहळ्याचे यजमान कोण असेल ? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भव्य राममंदिरापैकी तळमजला तयार झाला आहे.

देशभरातील 4 लाख गावांतील मंदिरांमध्येही प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे. या मंदिरांमध्ये मुख्य उत्सवात रामनाम संकीर्तन आणि कोणत्याही एका मंत्राच्या जपासह आरती आणि प्रसाद वाटप केला जाईल. यासोबतच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही होणार आहे. यामुळे करोडो भाविकांना हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहता येणार आहे. (Ram Mandir In Ayodhya)

आत्तापर्यंत रामललाची पूजा पूर्वीच्या परंपरेनुसार होत होती. आता भव्य राम मंदिर बांधल्यानंतर आणि राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेनंतर हे सर्व नव्याने ठरवले जात आहे. ज्यांचा जन्म अयोध्येत झाला, तेच रामलल्लाचे पुजारी असतील. आतापर्यंत रामलल्लाच्या पूजेसाठी एक मुख्य पुजारी आणि चार सहायक पुजारी आहेत. यासोबतच रामजन्मभूमी संकुलात उभारल्या जाणाऱ्या इतर मंदिरांसाठीही पुजारी नेमण्यात येणार आहेत. (Ram Mandir In Ayodhya)

बालकरूपातील रामलल्ला

राजस्थानमधील पांढर्‍या संगमरवरी आणि कर्नाटकातील ग्रॅनाइटपासून पाच वर्षांच्या बालकरूपातील रामलल्लाच्या ३ मूर्ती तयार केल्या जात आहेत. ऑक्टोबरमध्ये त्या पूर्ण होईल. त्यानंतर यापैकी एका मूर्तीची निवड संत आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाईल. त्यात स्थापन होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे, असे राम मंदिर ट्रस्टने सांगितले.  (Ram Mandir In Ayodhya)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.