अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात बसवली जाणारी रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली आहे. (Rammandir Pran Pratishtha) ही मूर्ती कशी असेल, याविषयी उत्सुकता आहे. शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) सर्व सदस्यांनी महासचिव चंपत राय यांना लेखी तीन पुतळ्यांबाबत आपले मत दिले होते. त्यानुसार मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Cristiano Ronaldo : यावर्षी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू मेस्सी नाही, तर ‘हा’ आहे)
5 वर्षांच्या बालकाच्या रूपात दिसणार रामलल्ला
चंपत राय (Champat Rai) यांनी सांगितले की, रामलल्लाची उभी मूर्ती गर्भगृहात बसवली जाणार आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आहे. ही मूर्ती 5 वर्षांच्या बालकाच्या रूपातील असणार आहे. ही मूर्ती राजपुत्र आणि विष्णूचा अवतार असल्याचे भासते. रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. या मूर्तीचा फोटो अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.
३ शिल्पकारांनी बनवल्या होत्या मूर्ती
रामलल्लाची मूर्ती निळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे. ३ शिल्पकारांपैकी शिल्पकार योगीराज (Arun Yogiraj) यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. रामलल्लाच्या तीन मूर्ती गणेश भट्ट, योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन शिल्पकारांनी तीन दगडांपासून बनवल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – Israel hamas conflict : सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष; इस्त्रायल सैनिकांना माघारी बोलविणार )
अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड
सत्यनारायण पांडे यांनी बनवलेली मूर्ती पांढऱ्या संगमरवरावर बनवली आहे. उर्वरित २ मूर्ती कर्नाटकातील निळ्या दगडाच्या आहेत. यामध्ये गणेश भट्ट यांनी दक्षिण भारतीय शैलीत मूर्ती तयार केली होती. यासाठी अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
रामलल्लाची (Rammandir) मूर्ती तयार करणारे 37 वर्षीय अरुण योगीराज म्हैसूर राजवाड्यातील कलाकार कुटुंबातून आले आहेत. त्यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापिठातून एमबीए केले, त्यानंतर एका खासगी कंपनीत काम केले. योगीराज यांनीच जगद्गुरु शंकराचार्यांची भव्य मूर्ती उभारली होती. त्यांनीच शंकराचार्यांची मूर्ती घडवली, जी केदारनाथमध्ये स्थापित करण्यात आली आहे. (Rammandir Pran Pratishtha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community