Randeep Hooda : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेते रणदीप हुड्डा यांची भगूर येथील सावरकर स्मारकास भेट

Randeep Hooda : अभिनेते रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी भगूर येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. या वेळी स्मारकात यांनी सावरकरांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून वंदन केले. भूषण कापसे यांनी हुड्डा यांना संपूर्ण स्मारकाची माहिती सांगितली.

235
Randeep Hooda : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेते रणदीप हुड्डा यांची भगूर येथील सावरकर स्मारकास भेट
Randeep Hooda : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेते रणदीप हुड्डा यांची भगूर येथील सावरकर स्मारकास भेट

नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते, अभिनेते रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी भगूर (Bhagur) येथील सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. या वेळी स्मारकात यांनी सावरकरांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून वंदन केले. भूषण कापसे यांनी हुड्डा यांना संपूर्ण स्मारकाची माहिती सांगितली. या प्रसंगी स्मारकाच्या वतीने हुड्डा यांना स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, खंडू रामगडे यांच्या हस्ते धनंजय किरलिखित वीर सावरकर हे पुस्तक व वंदे मातरम ध्वज भेट देण्यात आला.

(हेही वाचा – Sassoon Hospital : ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट)

येथून शक्ती घेऊन जात आहे – रणदीप हुड्डा

या वेळी बोलताना रणदीप हुड्डा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन ! ते एक एक भावना एक प्रेरणा आहेत. मी धन्य आहे की, मला त्यांची भूमिका साकारण्याची आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्याची संधी मिळाली, येथे येऊन खूप भावुक झालो आहे. आता येथून शक्ती घेऊन जात आहे.

New Project 2024 04 05T211353.284

या वेळी एकनाथ शेटे, अंकुश चव्हाण, खंडू रामगडे, आकाश नेहरे, संभाजी देशमुख, रमेश पवार, दीपक गायकवाड, अशोक मोजाड, ओम देशमुख, प्रसाद आडके, प्रमोद शेटे, गणेश राठोड, शाम सोनवणे, मयूर शेटे, निलेश हासे, सुनिल जोरे आदी भगूरकर उपस्थित होते. (Randeep Hooda)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.