- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील ५३ एकरावर वसलेले उद्यान असून १२ डिसेंबर २०२२ मध्ये हे उद्यान हे पुरातत्व वनस्पतीशास्त्रीय उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणून ओळखले जात. या वनस्पती उद्यानाला आता दोन वर्ष पूर्ण होत आहे. या वनस्पती उद्यानामध्ये २८३ प्रजातींची एकूण ४१३२ वृक्ष आहेत. (Rani Baug)
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात दुर्मिळ तसेच शेकडो वर्षापूर्वीचे वृक्ष अस्तित्वात असून सुमारे २८३ प्रजातींची एकूण ४१३२ वृक्ष आहेत. या उद्यानात दुर्मिळ, जुनी, स्थानिक देशी प्रजातीची तसेच विदेशी प्रजातींची आणि एकमेव जातीची वृक्ष अस्तित्वात असल्याने उद्यान जैवविविधतेने नटलेले आहे. सन १२ डिसेंबर २०२२ मध्ये उद्यानाच्या नावात अंशतः बदल करून या उद्यानास Botanical Garden चा दर्जा प्राप्त झाला. या उद्यानाचे नामकरण “वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय” असे करण्यात आले आहे. (Rani Baug)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी धुळीने माखलेले बॅरिकेड्स महापालिका पाण्याने धुणार)
या वनस्पती उद्यानामध्ये २८३ प्रजातींची एकूण ४१३२ वृक्ष आहेत. त्यामध्ये कृष्णवड, गोरखचिंच, स्वर्गीय कमळ, सिता अशोक, उर्वशी, काजुपुट, नारिकेल, कॅन्डल ट्री, कोको, कांडोळ, गेस्ट ट्री, कॉक स्क्रू कौशी, निडल फ्लॉवर ट्री, उंडी, करमळ, हिरडा, बेहेडा, मनिमोहर, वावळा, शिवण, सफेदा, दिवी-दिवी, गय, सफेद बाहावा, गुलाबी बाहावा, पिवळा बाहावा, कांचन, आपटा, काटेशेवर, सफेद शेवर मुचकुंद तुन, चेंडूफळ यांसारखी मुंबईमधील एकमेव अशी वृक्ष प्रजाती आहेत. (Rani Baug)
या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची हजारो वृक्ष असल्यामुळे वनस्पतीशास्त्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. उद्यानाचा वनस्पतीशास्त्रीय दर्जा लक्षात सेव्ह राणीबाग बॉटनिकल गार्डन फाउंडेशन’ चा सल्ला व सूचनांचा अंतर्भाव करून देखभाल केली जात आहे. दुर्मिळ व शेकडो वर्षापूर्वीची वृक्षसंपदा अस्तित्वात असल्यामुळे हे वनस्पती उद्यान पर्यटकांसह वनस्पती तथा वृक्ष अभ्यासकांसाठी हे उद्यान हे महत्वाचे ठरत आहे. (Rani Baug)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community