रणजित सावरकर यांची नाशिक येथील Abhinav Bharat Mandir येथे भेट; नूतनीकरणाच्या कामाची केली पाहणी

Abhinav Bharat Mandir : अभिनव भारत हीच देशातील पहिली क्रांतिकारी संघटना होती - रणजित सावरकर

56

सातंत्र्यवीर सावरकर (veer savarkar) यांचे नातू आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी या दिवशी नाशिकमध्ये येऊन अभिनव भारत मंदिराची पाहणी केली. याच वास्तूत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवली होती. या वाड्याचे शासनाकडून नूतनीकरण केले जात आहे. त्या निमित्ताने भेट देऊन रणजित सावरकर यांनी नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच अभिनव भारत मंदिर (Abhinav Bharat Mandir) कसे असावे, याबाबत तेथील अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

(हेही वाचा – अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार ? Devendra Fadnavis उत्तर देताना म्हणाले …)

अभिनव भारत हीच पहिली क्रांतीकारी संघटना

बंगालमध्ये काही गुप्त संघटना होत्या. मात्र, क्रांतिकारी संघटनेचे पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे अभिनव भारत हीच देशातील पहिली क्रांतिकारी संघटना होती आणि त्या माध्यमातून देशात क्रांतीची बीजे रोवली गेली. या अभिनव भारत संघटनेचे मुख्य केंद्र नाशिक येथे होते. या स्मारकातील पुस्तके, स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती बांधकाम विभागाने सुरक्षित ठेवली आहे. काही पुस्तकांचे डिजिटायलेशन करण्यास बांधकाम विभागास सांगितले आहे, असे रणजित सावरकर म्हणाले. या वेळी ज्या अभिनव भारत वाड्यात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीची ठिणगी पडली, तेथील दोन विटा रणजित सावरकर यांनी दादर येथील स्मारकात संग्रही ठेवण्यासाठी बरोबर घेतल्या.

New Project 52 3

या वेळी माध्यमांशी बोलतांना रणजित सावरकर म्हणाले, सशस्त्र क्रांतीचे केंद्र असलेली ही वास्तू नाशिकमध्ये (Nashik) असणे, ही अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाशिकमधील अनेक चांगले क्रांतिकारी सहकारी लाभले. सावरकरांचे सहकारी असलेल्या अन्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहकाऱ्यांचादेखील इतिहास मांडला पाहिजे. सध्या अभिनव भारतच्या जागेत जाण्यास अरुंद गल्ली असल्याने अडचणी येतात, पार्किंगची जागादेखील नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

‘वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्नचा सन्मान’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जनतेने ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी दिली होती. त्यामुळे त्या पदवी पलीकडेच काहीच नाही. सावरकरांना भारतरत्न (Bharat Ratna) द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी कधीच केली नाही; पण केंद्र सरकारने ती दिलीच तर तो भारतरत्नचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन रणजित सावरकर यांनी केले. (Abhinav Bharat Mandir)

New Project 55 3

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वैयक्तिक कौटुंबिक कारण काढून ब्रिटिशांकडून सवलती मिळवल्या आहेत. सावरकर विरोधकांनी हे ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे; पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून सावरकरांकडे बघितले जाते. त्यामुळे जो पक्ष आपण हिंदुत्ववादी म्हणतो त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी काही नसल्याने विरोधक माफीचा मुद्दा पुढे करतात.

सावरकरांना माफीवीर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्या विरोधात नाशिकचे सावरकरप्रेमी अॅड. मनोज पिंगळे यांनी याचिका दाखल केली आहे. याचीही माहिती रणजित सावरकर यांनी घेतली. (Abhinav Bharat Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.