‘हिंदुस्थान पोस्ट’च्या ‘संविधान दिन विशेषांका’चे रणजित सावरकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन

137

26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ तर्फे संविधान दिन विशेषांकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी रणजित सावरकर त्यांचे विचार मांडतील.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आणि प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार, 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजता हा कार्यक्रम आणि प्रकाशन सोहळा होणार आहे.

(हेही वाचाः 26 जानेवारीला संविधान लागू झालं, तरी 26 नोव्हेंबरला का साजरा केला जातो संविधान दिवस?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.