धार्मिक, पर्यटन, औद्योगिक, क्रीडा या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेलेले कोल्हापूर शहर. येथील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या रंकाळा तलावाचे संवर्धन केले जाणार आहे.गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात नव्हते, मात्र आता राज्य शासनाकडून तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी या कामाकरिता मिळाला आहे.
सुशोभिकरणाअंतर्गत तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करणे, तलावाचे संवर्धन करणे, विद्युत रोषणाई, कारंजे, संध्या मठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारणे ही काम केली जाणार आहेत.
(हेही वाचा – Vistara – Air India Merger : विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलिनीकरणाला सीसीआयची परवानगी)
मूलभूत सोयी-सुविधाअंतर्गत सुरू असलेल्या कामातून दुचाकी आणि चारचाकी पार्किंग सुविधा व्यवस्था करणे, 5 ठिकाणी कमानी आणि गेटसह गेटवे तयार करणे, विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रंकाळा टॉवर ते तांबट कमानीपर्यंत तलावाच्या भिंतीचे संवर्धन करणे, घाट दुरुस्ती करणे, अपुरा पदपथ तयार करणे, तांबट कमान जतन आणि संवर्धन , विसर्जन कुंड तयार करणे, लँड स्केपिंग, शौचालय दुरुस्ती, रंकाळा टॉवरचे जतन आणि संवर्धन करणे, मिनिचर पार्क आणि विद्युत रोषणाईच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.
संवर्धन आणि सुशोभिकरण !
कोल्हापुरातील जनता आणि पर्यटकांच्या विरंगुळ्याचे स्थान असलेल्या रंकाळा तलावाची निर्मिती झरे पाझरून झाली. रंकाळा परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे संवर्धन आणि सुशोभिकरण ही विकासकामे झाल्यावर रंकाळ्याचे सौंदर्य खुलायला मदत होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community