बलात्कार सत्र सुरुचः २० वर्षीय तरुणीवर शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार

मित्रांसोबत मरिन ड्राईव्ह येथे फिरुन पहाटेच्या सुमारास घरी परतणाऱ्या २० वर्षीय तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून, तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना चेंबूर वसाहत येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

अशी घडली घटना

पीडित तरुणी चेंबूर येथे राहणारी आहे. शुक्रवारी रात्री ती मित्रांसोबत मरिन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ती आणि तिचा एक मित्र चेंबूर येथे परतले असता, दोघे रस्त्याने जात असताना एक जण पाठीमागून आला व त्याने पीडित तरुणीच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवून पळवून लावले. त्यानंतर पीडित तरुणीला शस्त्राचा धाक दाखवून एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला व तो तेथून पसार झाला.

(हेही वाचाः डोंबिवलीतील पीडितेवर शेवटी झालेला बलात्कार टाळता आला असता, पण…)

आरोपीला केली अटक

यानंतर घाबरलेल्या तरुणीने मित्राला फोन करुन बोलावून घेतले आणि चेंबूर पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात बलात्कारची तक्रार देताच पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करुन पीडित तरुणीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मुलीने दिलेल्या वर्णणावरुन तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चेंबूर पोलिसांनी शनिवारी दुपारी चेंबूर परिसातून आरोपीला अटक केली आहे.

(हेही वाचाः तुमची मुलगी/बहीण ‘इन्स्टाग्राम’वर आहे? मग ती सुद्धा ठरू शकते नराधमांची ‘शिकार’! कशी? वाचा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here