गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले असून, राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी झपाट्याने पावले उचलण्यात येत आहेत. उपाययोजना म्हणून आता मुंबईत पुन्हा एकदा रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
गर्दीच्या ठिकाणी टेस्ट
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन आता मुंबईत गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँडिजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. बाजार किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी या टेस्ट सुरु करण्यात आल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले आहे. तसेच त्या दृष्टीने राज्यातील आरोग्य यंत्रणेला सुद्धा सक्षम करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः राज्यात पुन्हा निर्बंध? सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा)
…तर मास्कसक्ती शिवाय पर्याय नाही
राज्य सरकारकडून सध्या नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जर कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली तर मास्क वापरण्याची आवश्यकता राहणार नाही. पण समजा ही संख्या वाढतच गेली तर मास्कसक्ती शिवाय पर्याय राहणार नाही, असेही अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संध्याकाळी 4 वाजता मंत्रालयात मंत्रींमंडळ बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात येणआर असून, नवी नियमावली तयार करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचाः ठरलं! राज्यातील शाळा सुरू होण्याची तारीख शिक्षणमंत्र्यांकडून जाहीर)
Join Our WhatsApp Community