सध्या देशात कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या झपाट्याने वाढत आहे. नव्याने आलेला कोरोनाचा सबव्हेरियंट JN.1 ने चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरियंटचा झपाट्याने फैलाव होत आहे. सध्या राज्यात गुरुवारी (४ जानेवारी ) कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर शुक्रवारी ११०नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर या ११० मधील एकट्या पुण्यात (Pune) या व्हेरियंटचे सर्वात जास्त ९१ रुग्ण आढळून आले आहेत. (Corona JN.1update )
JN.1 ने देशभरात चिंता वाढली
ठाण्यामध्ये JN.1चे ५ रुग्ण तर बीड मध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी ४ जानेवारी रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. तर यातील एका रुग्णाला मधुमेह तर दुसऱ्या रुग्णाला हृदयरोगाची समस्या होती. कोरोना च्या JN.1 या प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात नवीन JN.1 चे ३१२ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे केरळ मध्ये आढळून आले आहे. (Corona JN.1update )
(हेही वाचा : Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले वाहतुकीत बदल ;जाणून घ्या काय आहे कारण)
४७ टक्के प्रकरणे केरळ मध्ये
देशातील JN.1चे एकूण रुग्णांपैकी ४७ टक्के प्रकरणे केरळ मध्ये आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. भारतात सक्रिय रुग्ण ४५६५ वर पोहोचली आहे.सध्या १० राज्यांमध्ये हा नवीन JN.1 व्हेरियंट वेगाने फोफावताना दिसत आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जेएन.1 व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे, पण धोकादायक नाही. मात्र, यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही पहा –