आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यभर दिसून येत आहे. सगळेच पक्ष तयारीला लागलेत. गेल्या वेळचा अनुभव जमेस धरून उबाठा गट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा, यासाठी महाविकास आघाडीमध्ये सतत मागणी करत आहे. त्यात प्रामुख्याने उबाठा गटाकडून सातत्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी आग्रही मागणी होत आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे केली होती; मात्र त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीने स्पष्ट नकार देण्यात आला. (Rashmi Thackeray)
(हेही वाचा – Western Railway: प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द)
आता रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) भावी मुख्यमंत्री व्हावे, अशी बॅनरबाजी वांद्रे येथील कलानगरमध्ये कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. २३ सप्टेंबर म्हणजे आज रश्मी ठाकरेंचा वाढदिवस असून युवासेनेकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘या बॅनरवर पुढचा मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच, त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते’, असा उल्लेख करत रश्मी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हे बॅनर्स लागले आहे.
याबाबत कार्यकर्त्यांनी म्हटलं की, मागचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून होते, आता येणारा मुख्यमंत्रीही आमच्या परिवाराचाच असेल. दिल्लीसारख्या राज्यात आतापर्यंत ३ मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याचे प्रतिबिंब आम्हाला रश्मी ठाकरेंमध्ये दिसते. ठाकरे कुटुंबातील शिवसेना परिवारातीलच मुख्यमंत्री होतील या उद्देशाने आम्ही हे बॅनर्स लावले आहेत.
महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र वेगळी भूमिका जाहीर केली होती. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेला नाही. त्या त्यांच्या पतीच्या सोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असं होत नाही. त्यामुळे राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं (Rashmi Thackeray) नाव असता कामा नये, असे त्यांनी म्हटले होते.
हेही पहा –