Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा – सुधीर मुनगंटीवार

महाराजांचे कार्य पुढे नेणाऱ्या गुरुदेव सेवा मंडाळच्या पाठीशासनाने उभे राहण्याची आवश्यकता

177
Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा - सुधीर मुनगंटीवार
Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा - सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील समाधी स्थळाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायला हवा, अशी आग्रही भूमिका घेऊन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

समाजात राष्ट्रभक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन आणि ग्रामविकासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन आणि किर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी गिरीश महाजन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामगीतेतून आत्मसंयमनाचे विचार मांडणाऱ्या तुकडोजी महाराजांनी १९३६ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. महाराजांच्या निर्वाणानंतर याच आश्रमातून त्यांचे विचार आजही जगापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

(हेही वाचा – State Government Scheme : दिव्यांगांसाठी राज्यशासनाकडून ‘दिव्यांगांच्या दारी’ या योजनेचे आयोजन)

गुरुकुंज येथे दरवर्षी जगभरातील लाखो भाविक भेट देतात. गुरुदेव सेवा मंडळाद्वारे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीस्थित गुरुदेव सेवाश्रम ही केवळ वास्तू नसून प्रेरणाकेंद्र आणि ऊर्जास्त्रोत आहे. या समाधी स्थळाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी गुरुदेव भक्त आणि राष्ट्रीय विचारसरणीच्या प्रत्येकाची मागणी असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. महाराजांच्या विचारांचे सोने सर्वत्र पसरवणाऱ्या आणि त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या पाठीशी शासनाने उभे राहण्याची आवश्यकता आहे, असेही मुनगंटीवार या चर्चेवेळी म्हणाले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृतकाळ सध्या सुरू असल्यामुळे याच काळात या प्रेरणास्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंतीही केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.