धनगर समाज आरक्षणासाठी बुधवारपासून महाराष्ट्रात २५ ठिकाणी तसेच खंबाटकी घाटात रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय चोंडी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी घेण्यात आला. दरम्यान, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी येथे यशवंत सेनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण (Reservation) मिळावे, यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे.
या उपोषणाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी या उपोषणाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. परंतु, दोन दिवसात सरकारकडून समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवार (२० सप्टेंबर ) पासून धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व महाराष्ट्रातील २५ विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली.धनगर आरक्षणप्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके आदी उपोषणाला बसले आहेत.
(हेही वाचा : ATS Karvai : दहशतवादी कारवाईला वेग ,मनमाड मध्ये एक संशयित ताब्यात)
दांगडे यांना सलाइन दिले जात आहे. रविवारी उपोषणस्थळी राज्यभरातील धनगर समाजाचे नेते व विविध संघटना यांची बैठक घेऊन शासनाला दोन दिवस मुदत दिली होती. ही मुदत मंगळवारी संपली. उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले, सरकारने दोन दिवसात मार्ग काढला जाईल, असे सांगितले होते. पण, रात्री उशिरापर्यंत कोणताच निरोप सरकारकडून आला नाही. त्यामुळे बुधवारपासून समाजबांधव खंबाटकी घाटात रस्ता रोको व महाराष्ट्रातील २५ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सरकार आमच्या बलिदानाची वाट पाहात आहे का? असा सवाल दोडतले यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community