Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Ratan Tata Death : उद्योजकतेबरोबरच नीतीमूल्यांची जपणूक करणारा द्रष्टा म्हणून रतन टाटांकडे पाहिलं जातं 

108
Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
  • ऋजुता लुकतुके 

फायद्यातील उद्योग उभे करण्याबरोबरच व्यवसायातील नीतीमत्ता जपणारा उद्योग समुह म्हणून टाटा समुहाकडे पहिल्यापासूनच पाहिलं जातं. संस्थापक जमशेदजी टाटा यांनी समुहाची जडण घडणच तशी केली होती. त्यामुळेच तर वैयक्तिक मालकी न ठेवता टाटा समुहाचा कारभार हा टाटा ट्रस्टतर्फे पाहिला जातो. आणि उद्योग समुहाची तब्बल ६० टक्के मालकी या ट्रस्टकडे आहे. समुहाचे तिसऱ्या पिढीतील अध्यक्ष रतन टाटा यांनी जमशेदजी टाटांनी घालून दिलेला नीतीमूल्य जपण्याचा दंडक टाटा सन्समध्ये अव्याहत पाळला. आणि व्यवसायात आधुनिकता आणण्याचा वारसाही जपला.  (Ratan Tata No More)

वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. त्या निमित्ताने देशाच्या या लाडक्या उद्योजकाविषयी फारशा माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया. (Ratan Tata No More)

(हेही वाचा- MHADA Pune Lottery : तब्बल ६२९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडत गुरुवारपासून…)

१. २८ डिसेंबर १९३७ मध्ये सूनी व नवल टाटा यांच्या पोटी रतन टाटांचा जन्म झाला. पण, ते १० वर्षांचे असतानाच त्यांचे आई, वडील वेगळे झाले. तेव्हापासून त्यांचा सांभाळ त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केला. रतन टाटांचं शालेय शिक्षण मुंबईतच झालं.

२. टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे ते पणतू होते

३. रतन टाटांचं आठवी पर्यंतचं शिक्षण कॅम्पिअन स्कूल इथं झालं. त्यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॅनन शाळेतून ते दहावी उत्तीर्ण झाले. कॉलेजची सुरुवातीची वर्षं त्यांनी सिमला इथं बिशप कॉटन शाळेतून पूर्ण केली. त्यानंतर ते कॉर्नेल विद्यापीठातून वास्तूविशारद झाले. तर हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक्रमही पूर्ण केला

४. अमेरिकेत असताना त्यांनी आयबीएम या प्रसिद्ध संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनीत नोकरीही सुरू केली होती. तिथेच एका मुलीशी त्यांचं प्रेमही जमलं होतं. त्यामुळे अमेरिकेतील जीवन त्यांना आवडत होतं. पण, मुलीच्या पालकांनी भारत – चीन युद्धामुळे या लग्नाला संमती दिली नाही. हे लग्नही मोडलं. त्यानंतर आणखी ४ वेळा ते लग्नाचा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचले होते. पण, प्रत्यक्षात त्यांनी कधीही लग्न केलं नाही. काही मुलाखतींमध्ये रतन टाटा यांनी याविषयी माहिती दिली आहे. पण, या महिला कोण होत्या हे सांगण्याचं मात्र टाळलं होतं.  (Ratan Tata Death)

५. रतन टाटांना उद्योग क्षेत्रात मान होता. नीतीमूल्य जपणारे उद्योजक असा त्यांचा लौकीक होता. तरुणही मोठ्या प्रमाणावर रतन टाटांना मानत. याचंच द्योतक म्हणजे २०२३ मध्ये रतन टाटा यांचे ट्विटर फॉलोअर्स १२ दशलक्षांवर गेले होते. देशातली सगळ्यात जास्त फॉलोईंग असणारे उद्योजक रतन टाटा होते. (Ratan Tata Death)

६. भारतातील मध्यम वर्गासाठी १,००,००० रुपयांत कार उपलब्ध करून देण्याचं रतन टाटा यांचं स्वप्न होतं. त्यातूनच अवतरली टाटा नॅनो. ४ जणांचं एक मध्यमवर्गीय कुटुंब एकाच स्कूटरवरून प्रवास करताना रतन टाटा यांनी पाहिलं. त्यातून त्यांना ही कल्पना सुचली होती. मध्यमवर्गीयांचं कारचं स्वप्न पूर्ण करणारे उद्योजक म्हणून रतन टाटांकडे पाहिलं जातं. (Ratan Tata Death)

७. भारतीय उद्योग क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी रतन टाटांना २००० साली पद्मभूषण तर २००८ साली पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं. (Ratan Tata Death)

८. टाटा समुहाचे संस्थापक जमजेदशी टाटा यांनी मुंबईतील आपल्या घरात सुरू केलेली रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालण्याची परंपरा रतन टाटा यांनीही सुरू ठेवली होती. रतन टाटांनाही पाळीव प्राणी आवडायचे.  (Ratan Tata Death)

९. टाटा नॅनो प्रमाणेच रतन टाटा यांच्या उद्योग क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे टीसीएस कंपनीची २००४ मध्ये झालेली शेअर बाजार नोंदणी. त्यानंतर टीसीएस देशातील दुसरी मोठी कंपनी बनली. या शिवाय कोरस, टेटली चहा आणि जॅग्वार – लँड रोव्हर या आंतरराष्ट्रीय ब्रँडची खरेदीही रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालीच झाली (Ratan Tata Death)

१०. २०१४ साली टाटा समुहाने आयआयटी मुंबईला ९५ कोटी रुपये दान म्हणून दिले. या पैशातून देशात अभियांत्रिकी डिझाईनिंगची सुरुवात व्हावी अशी त्यांची इच्छा होती  (Ratan Tata Death)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.