Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि सावरकर स्मारक यांचा जिव्हाळा

82
Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि सावरकर स्मारक यांचा जिव्हाळा
Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि सावरकर स्मारक यांचा जिव्हाळा

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. ८६ वर्षीय रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी (१० ऑक्टोबर) दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनामुळे अमूल्य रत्न गमावले”, सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली)

रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर उद्योग, राजकारण आणि चित्रपट जगतातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अनेक मान्यवर टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. रतन टाटा आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारक यांचीही एक आठवण आहे. रतन टाटा यांनी २७ ऑगस्ट २०१५ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली होती.

दरवर्षी राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार (Arvind Inamdar) यांच्या ‘अरविंद इनामदार फाऊंडेशन’कडून प्रामाणिकपणे आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात येतो. २०१५ मध्ये तो कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने स्मारकात आलेले रतन टाटा यांनी स्मारकात चालू असलेले कार्य स्वतःहून जाणून घेतले आणि वीर सावरकरांप्रती आदर व्यक्त केला. स्मारकाच्या वतीने टाटा यांना सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक भेट देण्यात आले हाेते. या वेळी स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि सहकार्यवाह राजेंद्र वराडकर हे उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.