Ratan Tata No More : टाटा समुहाला आधुनिकतेचा साज चढवणारा द्रष्टा

Ratan Tata No More : पद्मविभूषण रतन टाटा यांचं ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झालं

125
Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Ratan Tata Death : रतन टाटांबद्दलच्या ‘या’ १० रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
  • ऋजुता लुकतुके 

टाटा समुहातील मुख्य कंपनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झालं आहे. देशातील आद्य उद्योग समुह असलेला टाटा ब्रँड अधिक आधुनिक आणि सर्वसमावेशक करण्याचं काम रतन टाटा यांनी केलं. टाटा ब्रँड सगळ्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये दिसेल याची काळजी रतन टाटा यांनी घेतली. आणि टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स अशा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कंपनीचा विस्तार केला. टाटा समुहाला नवीन उद्योग दृष्टी देणारे आणि उच्चं नीतीमूल्य असेलेले उद्योजक म्हणून रतन टाटा देशात ओळखले गेले.  (Ratan Tata No More)

(हेही वाचा- Ratan Tata Death : ‘भारताने एक आदर्श आणि प्रतिभावान मुलगा गमावला’ रतन टाटा यांच्या निधनानंतर नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धाजंली  )

बुधवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं तेव्हाच ते अत्यवस्थ होते. अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यसरकारकडून सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपण पाहूया रतन टाटा यांचा उद्योजकतेचा प्रवास.  (Ratan Tata No More)

  • १९३७ : रतन टाटा यांचा सुनू व नवल टाटा यांच्या पोटी जन्म
  • १९५५ : १७ व्या वर्षी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातील अभ्यासक्रम सोडून वास्तूविशारद आणि अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं
  • १९६२ : वास्तूविशारद म्हणून पदवी पूर्ण केली
  • १९६२ : सुरुवातीला जगभरातील काही नावाजलेल्या कंपन्यांबरोबर काम केल्यानंतर टाटा समुहात पदार्पण (लॉस एंजलीस इथं जोन्स अँड एमॉन्समध्येही काही काळ नोकरी)
  • १९६३ : सुरुवातीचे सहा महिने जमशेदपूर इथं पोलाद व वाहन उद्योग कंपन्यांमध्ये प्रशिक्षण. त्यानंतर टाटा स्टील व टाटा आयर्न कंपनीत कार्यरत
  • १९६५ : टिस्को (आताची स्टील कंपनी) च्या अभियांत्रिकी विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती
  • १९६९ : टाटा समुहाच्या ऑस्ट्रेलियातील प्रकल्पात कार्यरत
  • १९७० : भारतात परतल्यावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिेसेसमध्ये नियुक्ती
  • १९७१ : नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे संचालक
  • १९९७४ :  टाटा सन्सच्या संचालक मंडळात संचालन म्हणून निवड
  • १९७५ :  हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण
  • १९८१ :  टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती, इथे हाय-टेक उद्योगात गुंतवणूक करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली. आणि टाटा समुहाला आधुनिकतेकडे नेलं
  • १९८३ :  रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समुहाने टाटा सॉल्ट हा ब्रँड विकसित केला. भारतातला हा पहिला मीठाचा राष्ट्रीय ब्रँड ठरला. आणि आयोडाईज्ड मीठ देशात आणण्याचा मान टाटा समुहाला जातो.
  • १९८६ :  एअर इंडिया या राष्ट्रीय विमान कंपनीचे संचालक. १९८९ मध्ये टाटांनी हे पद सोडलं.
  • २५ मार्च १९९१ :  टाटा सन्स व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून विश्वास. जेआरडी टाटांचे वारसदार म्हणून रतन टाटांची निवड. १९९१ चं वर्ष देशाच्या इतिहासात महत्त्वाचं आहे. कारण, तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था खुली झाली. आणि खुल्या अर्थव्यवस्थेत जागतिक स्पर्धा देशात घुसणार होती. भारतीय कंपन्यांना थेट परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार होती. आणि अशावेळी टाटा समुहाला जागतिक स्पर्धेसाठी तयार कऱणं हे रतन टाटांचं पहिलं आव्हान होतं. शिवाय टाटा समुहाची रचनाही बदलावी लागणार होती. हे काम रतन टाटांनी अगदी व्यवस्थित आणि शिस्तीत केलं.
  • १९९९ :  रतन टाटांचं टाटा मोटर्सवर पहिल्यापासून लक्ष होतं. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली समुहाने आपला वाहन उद्योग अमेरिकन दिग्गज कंपनी फोर्डकडे नेला. हॅचबॅक आणि लहान गाड्यांच्या क्षेत्रात सहकार्य करार करण्याचा टाटाचा प्रस्ताव फोर्डने फेटाळला. इतकंच नाही, तर कंपनीला अपरिपक्व म्हणून हिणवलंही. पण, रतन टाटांनी हा अपमान मानला नाही. त्यातून टाटा मोटर्समध्ये बनणाऱ्या गाड्यांवर त्यांनी लक्ष दिलं. उद्योग वाढवला. टाटा मोटर्स त्यांची वैयक्तिक लाडकी कंपनी होती. आणि पुढे जॅग्वार लँडरोव्हर हे ब्रँड टाटांनी चक्क विकत घेतले.
  • २००० :  रतन टाटा देशाचा तिसरा मानाचा सन्मान पद्मभूषणने सन्मानित. त्याचबरोबर टाटा समुहाने टेटली टी, कोरस असे आंतरराष्ट्रीय ब्रँड अधिग्रहित केले. टाटा समुहाचा जागतिक विस्तार यामुळे शक्य झाला. त्याबरोबर जॅग्वार अँड लँडरोव्हर ब्रँडचं अधिग्रहणही तेव्हाच सुरू झालं. टाटा खऱ्या अर्थाने जागतिक ब्रँड बनला.
  • २००४ :  रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टीसीएस ही टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली. पुढील २० वर्षांत कंपनीच मूल्य १८३ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. भारतातील ही दुसरी मोठी कंपनी आहे.
  • २००६ :  टाटा समुहाचा डायरेक्ट – टू – होम टीव्ही उद्योगात प्रवेश. टाटा स्काय हे या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. केबल व्यवसायातील टाटाचा प्रवेश हे रतन टाटांचं स्वप्न मानलं जातं.
  • २००८ :  ज्या फोर्ड कंपनीने टाटांशी भागिदारी करण्याचं नाकारलं होतं, त्या कंपनीला टाटा समुहाने सावरलं. फोर्ड कंपनी तेव्हा कर्जाच्या विळख्यात होती. आणि टाटा समुहाने जॅग्वार अँड लँडरोव्हर ब्रँडला त्यांच्या कर्जासह विकत घेतलं. २.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा तो व्यवहार होता. रतन टाटांच्या कारकीर्दीतील हा नाट्यमय प्रसंग म्हणावा लागेल.

(हेही वाचा- Ratan Tata Death : “ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे”, रतन टाटा यांच्या निधनानंतर फडणवीसांची श्रद्धांजली)

याच वर्षी रतन टाटांना पद्मविभूषण हा देशातील दुसरा मानाचा पुरस्कार मिळाला

  • डिसेंबर २०१२ :  ५० वर्षांच्या कारकीर्दीनंतर रतन टाटांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला. तेव्हापासून ते टाटा सन्सचे एमिरेटस अध्यक्ष बनले
  • २०२२ : टाटा समुहाने एअर इंडिया या राष्ट्रीय विमान कंपनीला पुन्हा एकदा आपल्या पंखांखाली घेतलं. त्यासाठी समुहाने १८,००० कोटी रुपये खर्च केले. या व्यवहारातही रतन टाटा यांचा वाटा होता.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.