Ratangiri Mansoon Update: रत्नागिरीत तुफान पाऊस; ‘जगबुडी’मुळे संपर्क तुटला!

195
Ratangiri Mansoon Update: रत्नागिरीत तुफान पाऊस; 'जगबुडी'मुळे संपर्क तुटला!
Ratangiri Mansoon Update: रत्नागिरीत तुफान पाऊस; 'जगबुडी'मुळे संपर्क तुटला!

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी आपत्ती उभी राहिली आहे. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला असून, यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि सिंधुदुर्ग भागात जोरदार पावसामुळे रस्ते, बाजारपेठ आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. (Ratangiri Mansoon Update)

खेड तालुक्यातील जगबुडी नदीने (Jagbudi River) इशारा पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात समुद्र खवळल्याने आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ कृती करत नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठी आणि सखल भागातील लोकांना विशेषतः सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. 

(हेही वाचा – Vadodara: विद्यार्थी जेवत असतानाच शाळेची भिंत कोसळली; घटना सीसीटीव्हीत कैद)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानीय प्रशासनाने मदत कार्य आणि पुनर्वसन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. रेस्क्यू टीम्स (Rescue teams) आणि आपत्कालीन सेवा पूर्णपणे सक्रिय आहेत. नागरिकांना आपत्कालीन क्रमांकांची माहिती देऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये अडचणी आल्याने लोकांनी खासगी वाहतुकीचा वापर सुरू केला आहे.  (Ratangiri Mansoon Update)

(हेही वाचा – Anand Mahindra on Microsoft Outage : मायक्रोसॉफ्ट सर्व्हर बंद पडल्यावर आनंद महिंद्रांनी अशी उडवली मायक्रोसॉफ्टची टर 

रत्नागिरीतील (Ratnagiri) शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आले असून, पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता जपावी असे आवाहन करण्यात आले आहे. (Ratangiri Mansoon Update)

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.