अनेक सरकारी बॅंकांसाठी महत्त्वाची घोषणा; तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर

145

स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंकेबरोबरच अनेक सरकारी बॅंकांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI, PNB, Canara Bank आणि Bank of Baroda च्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने शुक्रवारी यांसदर्भातील माहिती दिली.

SBI चे रेटिंग काय?

मूडिज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंकेचे डिपाॅझिट रेटिंग मागच्या काळापासून स्थिर असल्याचे म्हटले आहे. मूडीजने एसबीआयला दिर्घकालन स्थानिक आणि परदेशी मुद्रा बॅक डिपाॅझिट रेटिंग बीएएर्थी कायम ठेवले आहे. तर बाकी तीन सार्वजनिक बॅंकांचे दीर्घकालीन बॅंक डिपाॅझिट रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

( हेही वाचा: ICC ऑनलाईन फ्राॅडचा बळी; काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना )

कॅनरा बॅंक आणि पीएनबीचे रेटिंग काय?

एसबीआयच्या दीर्घकालीन बॅंक डिपाॅझिट रेटिंगला बीएएर्थी असले तरी आता बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक तसेच पीएनबी सारख्या दीर्घकालीन बॅंक डिपाॅझिट बीएएवन वरुन बीएएर्थ्री करण्यात आले आहे. सार्वजनिक बॅंकांच्या डिपाॅझिट रेटिंगमध्ये झालेली ही सुधारणा आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे सूचित करते, असे सांगितले जात आहे. यामधून गरज पडल्यास बॅंकांना उच्च पातळीवरील सरकारी मदत मिळू शकते असेही दर्शवले जात आहे. मूडीज रेटिंग एजन्सीने पुढील एक ते दीड वर्षांमध्ये बॅंकांची स्थिती आणि गुणवत्ता चांगली राहणार असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.