Free Ration Update: रेशन घेण्याच्या नियमात झाला मोठा बदल! काय आहे नवी तरतूद?

156

तुमच्याकडे रेशनकार्ड (शिधापत्रिका) असेल आणि तुम्ही शिधापत्रिकेचे लाभार्थ्यी आहात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने अंत्योदय रेशन कार्डच्या लाभार्थींना एक खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने अंत्योदय कार्ड धारकांवर मोफत उपचार व्हावे यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने शिधापत्रिकेच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत उपचार, काय आहे केंद्र सरकारची योजना? )

सरकारी शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी ठरवलेल्या नियमांमध्ये अन्न व सार्वजनिक वितरण विभाग बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन तरतुदीचा मसुदा आता जवळपास तयार झाला असून यासंदर्भात राज्य सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तर जाणून घ्या काय आहेत नवीन तरतुदी?

म्हणून नवीन तरतुदी येणार

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय तरतुदीमध्ये बदल करणार आहे. दरम्यान आता नवीन येणाऱ्या तरतुदी पूर्णपणे पारदर्शक असतील, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून सांगितले जात आहे.

जाणून घ्या का होणार बदल

या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गेल्या अनेक महिन्यांपासून रेशनच्या तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत राज्यांशी बैठक सुरू असल्याची माहिती दिली आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्र शिधापत्रिकेचे लाभार्थ्यांसाठी नवीन तरतुदी तयार केली जात आहेत. ही तरतूद लवकरच निश्चित केली जाणार आहे. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन तरतुदी लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळणार आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना’ लागू करण्यात आली आहे. साधारण 69 कोटी लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला साधारण 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.