केंद्र सरकारच्या PMGKAY योजनेत मोठा बदल! कोणाला मिळणार मोफत अन्नधान्याचा लाभ?

144

मोदी सरकारने देशातील ८० कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना आनंदाची भेट देत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत २०२३ मध्ये मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनेत करा गुंतवणूक! होईल लाखोंचा फायदा)

फक्त रेशनकार्ड धारकांनाच मिळणार लाभ 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा लोकांनाही मोफत रेशन मिळत होते. पण राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आता फक्त गरीब रेशनकार्ड धारकांनाच गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे. सरकारने एप्रिल २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना बंद होणार अशी चर्चा होती परंतु मंत्रिमंडळाने ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी जवळपास दोन लाख कोटी खर्च होईल. हा संपूर्ण खर्च केंद्र सरकारमार्फत केला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गहू, तांदूळ आणि भरड धान्य १ ते ३ रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ पर्यंत ही रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जाणार नसल्याचे म्हटले होते. परंतु याचा लाभ आता फक्त रेशनकार्ड धारकांना मिळणार आहे. याआधी ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा लोकांनाही लाभ मिळत होता.

देशात पुरेसा अन्नसाठा 

दरवर्षी १ जानेवारीला १३८ एलएमटी गहू आणि ७६ एलएमटी तांदूळ स्टॉकमध्ये असणे आवश्यक आहे. यावेळी देशात पुरेसा अन्नसाठा आहे. यामुळेच सरकारने २०२३ मध्येही रेशनकार्ड धारकांना मोफत वितरणाची योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.