RCMS : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त

80
RCMS : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त
RCMS : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ १५ दिवसांपासून बंद; नागरिक त्रस्त

शिधापत्रिका काढण्यासाठी, त्यातील नावे कमी-अधिक करण्यासाठी यापूर्वी अनेकदा महापालिकेत चक्कर मारावी लागत असे. नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र मागील दोन आठवड्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस)चे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे वसईत शिधापत्रिकेच्या संबंधित एक हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.

(हेही वाचा – Cabinet meeting: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सर्व वाहनधारकांसाठी FASTag अनिवार्य)

नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरीक सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही, तर काही वेळा दलालाकडून ही नागरिकांची आर्थिक लूट होत असे. असे प्रकार थांबविण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे. गेल्या २ आठवड्यापासून अधिक काळ शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाइन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत. संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात त्यांना ही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे. शासनाने वरीष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिधापत्रिकांची कामे ऑनलाइन केली आहेत; मात्र त्याचे वरीष्ठ स्तरांवरून नियोजन नसल्याने सातत्याने संकेतस्थळ बंद, तर कधी चालतच नाही. त्यामुळे कामे होत नाही. ऑफलाईन असतांना शिधापत्रिकेवर नावे चढवणे, उतरविणे अशी कामे पटकन होत होती. आता संकेतस्थळाच्या अडचणीमुळे कामे होत नाहीत. त्यामुळे ऑफलाईन होते तेच बरे होते, अशी प्रतिक्रिया काही शिधापत्रिकाधारक व्यक्त करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.